आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामचे मुख्यमंत्री विराेधकांच्याच बाजूचे, फडणवीस मात्र कणखर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘सिंचन घोटाळा प्रकरणात विधिमंडळात िवरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आमचे (अाघाडी सरकारचे) मुख्यमंत्री आमच्या बाजूने उभे राहायला हवे होते, मात्र ते विरोधकांचीच बाजू घेत होते. अाजचे मुख्यमंत्री मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या पाठीशी कणखरपणे उभे राहतात. आम्ही भाजप-सेनेचे २२ मंत्री भ्रष्टाचारी असल्याचे पुराव्यासह सांगितले. मात्र फडणवीस भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. त्याचबरोबर बारा खाती असलेल्या खडसेंनाही त्यांनी ‘सरळ’ केले. आमच्या काळात आजच्या कणखर मुख्यमंत्र्यांप्रमाणे सहकारी मंत्र्याची बाजू आमच्या मुख्यमंत्र्यांनी मांडली असती तर ही वेळ काँग्रेस-राष्ट्रवादीवर आलीच नसती’, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना खडे बाेल सुनावताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मात्र काैतुक केले.

रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनच्या वतीने अायोजित कार्यक्रमात पत्रकार राजा माने यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सिंचनाबाबत ते म्हणाले, ‘चितळे समितीने टक्के सिंचन झाल्याचा अहवाल दिला आहे. कालावधी गेल्यानंतर प्रत्येक घटकाची किंमत ठरते. शिवाय त्या काळात महागाईही वाढली. याचा परिणाम म्हणून प्रकल्पांच्या किमतीही वाढल्या. वाशिम जिल्ह्यातील एक काम आम्ही मंजूर केले होते, त्यावेळी त्याची किंमत ७० कोटी होती. आजच्या सरकारने त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता िदली आहे, त्याची किंमत ७०० कोटी रुपये. हे वास्तव आहे, असे पवार यांनी सांगितले. आमच्या सरकारने उपसा सिंचन योजना मंजूर केल्या, उजनीची उंची वाढविली, त्यामध्ये धरणामध्ये १४ टीएमसी अधिक पाणी साठते. कोयना धरणाची उंची वाढवली. त्यामध्ये आज अतिरिक्त टीएमसी पाणी थांबते. टीएमसी पाणी साठविण्यासाठी ८०० ते हजार कोटी रुपयांचा खर्च येतो, आम्ही शासनाचा पैसा वाचवून ही कामे करून घेतली. पण विरोधकांनी मलाच ठरवून बदनाम केले. चौकशी सुरू आहे, अधिक बोलणे योग्य नाही. लवकरच दूध का दूध... होऊन जाईल’, असे ते म्हणाले.

मराठा आरक्षणावर अजित पवार यांनी आम्ही राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती, जी माहिती संकलित केली गेली, ती न्यायालयात टिकली नाही. आरक्षण मागणीचा औरंगाबादला पहिला मोर्चा झाला. सर्व मोर्चातील मागण्या एकच आहेत. तामिळनाडूमध्ये ५२ टक्के आरक्षण िदले आहेच. मराठा समाजाबरोबरच लिंगायत, मुस्लिम धनगर समाजालाही आरक्षण देणे अशक्य नाही. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार होते ? मग काय झाले त्याचे ? आश्वासने ही पाळण्यासाठी असतात. उलट मुख्यमंत्री याबाबत माध्यमांना चुकीची वक्तव्ये करत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष गुरूगोविंदसिंग बोमरा यांनी अजित पवार यांचे स्वागत केले. यावेळी शहरातील सर्व उद्योजक, व्यापारी रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...