आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीकडून 150 रिक्षांतून 60 हजार लिटर पाण्याचे जार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - येरमाळ्यातील यात्रेत भाविकांना राष्ट्रवादीने पिण्यासाठी थंड शुध्द पाण्याची व्यवस्था केली असून मंगळवारी (दि.११) उस्मानाबादेतून १५० ऑटोरिक्षातून ६० हजार लिटर पाणी पाठविले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनात मनोगत शिनगारे यांनी यासाठी पुढाकार घेतला. मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी चौकात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी पाणी घेऊन जाणाऱ्या वाहनांचे पूजन केले.

यावेळी मनोगत शिनगारे, नगरसेवक अभय इंगळे, राजाभाऊ सोनटक्के, सिध्दोजी राजेनिंबाळकर, मनोज देशमुख, गफूर शेख, जमाल तांबोळी उपस्थित होते. दरम्यान, सोलापूर येथील महिला भाविक अर्चना जोगडे, संपदा साठे, पार्वती वाणी, गजराबाई कसबे यांनी येरमाळा यात्रेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उत्तम असल्याचा अभिप्राय दिला.
बातम्या आणखी आहेत...