आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळसूत्र विकून अनाथांचा सांभाळ, नीळ दांपत्याची १६ वर्षांपासून सेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शासकीय अार्थिक न साह्य घेता, पत्नीचे सौभाग्याचं लेणं असलेले मंगळसूत्र विकून अनाथांना सांभाळणारा एक अवलिया. तो कोंडी येथील असून त्याचे नाव संतोष नीळ. त्यांनी अनाथ १८ मुलांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचे काम केले आहे. मुला-मुलींना कौटुंबिक वातावरण मिळत आहे.
संतोष नीळ त्यांची पत्नी मंगल यांनी विविध ठिकाणी सापडलेल्या समाजाकडून नाकारलेल्या मुलांना मायेचा आसरा देत आपलेसे केले. नीळ दांपत्याचे २००१ मध्ये विवाह झाला. तेव्हापासून स्वत:ला मूल न होऊ देता, अनाथ मुलेच आपली आहेत, अशी भूमिका ठेवत शून्य ते २४ वर्षांपर्यंत मुलांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करीत आहेत. त्यांनी दोन मुलींची लग्नेदेखील लावून दिली आहेत. नीळ दांत्याच्या वाट्याला समाजाकडून मानसन्मानऐवजी हेटाळणी येत आहे. तरीदेखील ध्येयापासून बाजूला न हटता अनाथांची सेवा सुरू आहे. त्यांच्याकडे विविध जाती-धर्माची मुले अाहेत.

नावाप्रमाणे घेतली विद्या
अनाथालयात एक विद्या नावाची मुलगी आहे. तिने विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने एमबीए करण्यासाठी प्रवेश घेतला परंतु वार्षिक शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने प्रथम वर्षातून शिक्षण बंद केले. त्यामुळे ती खासगी कंपनीमध्ये काम करत अाहे. मुलांची संख्या वाढल्यामुळे खर्चाचे प्रमाणही वाढत आहे. तरी संतोष नीळ कोणाच्या दारात मागणीसाठी जात नाहीत हे विशेष.

मदतीचा हात हवा
^लहानपणापासून समाज कार्याची आवड आहे. विविध जाती धर्माची मुले अाहेत. त्यांना जातीचा दाखला काढण्यासाठी इतर संस्थांकडे विचारणा केली असता कोणीच मदत केली नाही. गावातूनही कोणीच मदत करत नाही. सोमा राऊत नेहमी मदत करतात. १८ मुले, तीन वृद्ध, आई वडिलांसह २५ जणांना सांभाळत आहे. एवढे कुटुंब सांभाळण्यासाठी समाजाकडून मदतीची अपेक्षा आहे.” संतोष नीळ, संतोष कमल अनाथालय, कोंडी

नकोशी अलिशा आली अनाथालयात
संतोष कमल अनाथालयात मुलींचे प्रमाण जास्त आहे. पाचवी मुलगी झाल्यानंतर आई मृत झाली. चार मुली मोठ्या होत्या म्हणून नातेवाईक घेऊन गेले. परंतु जन्मलेल्या मुलीला कोणीच घेऊन गेले नाही. शेवटी आम्हाला फोन आल्याबरोबर कर्नाटकातील उदगीर येथे जाऊन मुलीला ताब्यात घेतले. नकोशा असलेल्या मुलीचे नाव अलिशा असून ती आता अकरा महिन्याची आहे.
बातम्या आणखी आहेत...