आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणमंत्र्यांच्या अंगावर निवेदन फेकून, भंडारा उधळून निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भाषण करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात धनगर समाजाच्या चार -पाच कार्यकर्त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठास नावे द्यावे, या मागणीचे निवेदन भंडार शिक्षण मंत्र्यांच्या अंगावर टाकला. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषणा दिल्या. त्यावेळी पोलिसांनी त्या पाच कार्यकर्त्यांना सभागृहाच्या बाहेर काढले. अहिल्यादेवी होळकर की सिद्धेश्वर विद्यापीठ नाव द्यायचे, हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. गत महिन्यामध्ये धनगर समाजातर्फे अहिल्यादेवी होळकर विद्यापीठास नाव द्यावे, या मागणीसाठी पावसात मोर्चा काढला. तर सोमवारी विविध संघटनांकडून विद्यापीठास सिद्धेश्वर नाव देण्यात यावे, यासाठी मोर्चा काढल्याने नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. 

हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे आले हाेते. उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना हा प्रकार घडला. उमेश काळे, शेखर बंगाळे, शरानू हांडे, अनिल घोडके, मळाप्पा नवले अशी निवेदन भंडारा टाकणाऱ्यांची नावे आहेत. ते निवेदन मंत्र्यांच्या अंगावर फेकून सभागृहाच्या बाहेर पडले. हा प्रकार झाल्यानंतर शिक्षणमंत्री म्हणाले की, विद्यापीठ नामांतरास अहिल्यादेवी होळकर नाव देण्यास शिक्षणमंत्री विरोध करीत आहेत, हे चुकीचे आहे. काही जणांना खूप घाई असते. वृत्तपत्रात फोटो यावेत, प्रसिद्धी मिळावी म्हणून स्टंटबाजी केली जाते. तरी सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्यांनी काही नावांची शिफारस शासनाकडे केली आहे. त्यानुसार शासन स्तरावर योग्य पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन याप्रसंगी त्यांनी दिले. 

दोन वेळा वीजपुरवठा बंद 
शिक्षणमंत्रीविनोद तावडे मुख्य कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदरच हुतात्मामध्ये आले. अर्धा तास त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने काय करता येईल? यासाठी शिक्षकांकडून सूचना ऐकल्या. तसेच गणितीय पद्धत सोपी करण्यासाठी काय करता येईल? यावरून आठवडा बाजार हे मॉडेल ठरेल, असे सांगितले. हा कार्यक्रम सुरू असताना सभागृहातील वीजपुरवठा दोन वेळा खंडीत झाला. 

‘तीन नावांचा ठराव सिनेटने पाठवला, मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर होईल निर्णय’ 
सोलापूर विद्यापीठाच्यानामांतराच्या संदर्भात दोन मागण्या पुढे आल्या. अहिल्याबाई होळकर सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्याबाबतच्या मागण्या माझ्याकडे आल्यात. विद्यापीठाच्या सिनेटने त्या संदर्भात ठराव पाठवला आहे. त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ सिद्धेश्वर या तीन नावांचा समावेश आहे. त्याआधारे राज्यपाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय होईल. राज्यशासनाचा कोणत्याही नावास विरोध नाही, असे शालेय उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. श्री. तावडे म्हणाले की, विद्यापीठ सिनेटकडून तीन नावांचा ठराव आला आहे. त्यावर आवश्यक त्या विभागांचा विचार करून तो मंत्रिमंडळाकडे येण्याची प्रक्रिया आहे. अशीच प्रक्रिया पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची झाली होती, ती अशीच लांबलेली होती. मागण्या होत होत्या, त्या प्रक्रियेचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर योग्य निर्णय होईल. 
बातम्या आणखी आहेत...