आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहरूनगरचे मैदान दुर्लक्षित का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होटगीरोड, विजापूर रोड जुळे सोलापूर भागातील सुमारे दोन लाख नागरिकांसाठी असलेले नेहरूनगर शासकीय मैदान हे एकमेव. या मैदानावर रोज सकाळी सायंकाळी हजारो नागरिक व्यायामासाठी येतात. खेळाडूही याचा लाभ घेतात. हे मैदान जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या ताब्यात आहे. वनखात्याची जागा आहे असे कारण सांगून गेल्या २७ वर्षांपासून जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाने या मैदानाकडे दुर्लक्ष केले आहे. शालेय स्पर्धा आयोजित करण्यासाठी मैदानाची थोडी दुरुस्ती करण्यात येते. नंतर या मैदानाकडे क्रीडा कार्यालय पुढील वर्षीच लक्ष देते.
जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या (डीपीडीसी) माध्यमातून गेल्या २७ वर्षांत कोणत्याही जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला नाही. मात्र, सोलापूर जॉगर्स क्लबने या मैदानाच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केल्याचे दिसते. जॉगर्स क्लबचे तत्कालीन अध्यक्ष भगवंतराव मोरे जिल्हाधिकारी वेणुगोपाळ रेड्डी यांच्या प्रयत्नातून पंधे कन्स्ट्रक्शनने मैदानावर जॉगिंग ट्रॅक मोफत करून दिला. नऊ एकर मैदानावर सहाशे मीटर लांब चार मीटर रुंदी असलेल्या या ट्रॅकसाठी अडीच लाख रुपये खर्च झाले. त्यानंतर तत्कालीन उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पालिकेच्या माध्यमातून मैदानाच्या कडेने तारेचे कुंपण घालून विद्युत व्यवस्थेची सोय करून दिली होती. त्यानंतर विद्युत व्यवस्था कोलमडली, तारेचे कुंपणही तोडले जात आहे. जॉगिंग ट्रॅकही खराब होत आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, स्वच्छतागृह स्वच्छतागृहासाठी असलेल्या सार्वजनिक नळाचा वापरही आजूबाजूचे नागरिक करतात. क्रीडा कार्यालयाची व्यायामशाळा होती. तीही बंद पडली. याकडे क्रीडा कार्यालय साफ दुर्लक्ष करीत आहे.

मैदानाचाताबा २७ वर्षांपासून जिल्हा क्रीडा कायार्लयाकडेच
तत्कालीनजिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांनी ३०-३-१९८८ ला ३.२७ हेक्टरचा २१ २२ हा भूखंड क्रीडा कार्यालयाच्या ताब्यात दिला. सद्यस्थितीत सात-बारा उतारा, फेरफार नोंदीत जिल्हा क्रीडाधिकारी यांचे नाव आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या ताब्यात असलेला सर्व्हे नंबर ५९० ते ५९४ हा मुंबई गॅझेट मार्च १८७९ नुसार सोलापूर जिल्ह्यातील वनखात्याच्या आरक्षित जागांच्या सूचीत नाही. त्यामुळे क्रीडांगणाचा विकास करण्यास कोणतीही बाधा येणार नाही.
व्हाॅली बाॅल
लाॅन
जाॅगिंग ट्रॅक
धावण्याचा ट्रॅक
कबड्डी
बास्केट बॅाल
खोखो
लाॅन
पार्किंग
जिम्नॅशियम हाॅल
रात्री मद्यपींचा वावर असतो.
डीपीतील सामान गायब.
खांबावरील दिवे गायब झाले.
डीपी गायब झाला आहे.
शॉर्टकटसाठी तारेचे कुंपण तोडून वाट लावली.
बाजूच्या कॉलनीतील नागरिक कचरा टाकतात.
अशा आहेत समस्या
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अंदाजपत्रक मंजूर करून घेणा
^२०११मध्ये तत्कालीन क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते. जिल्हा नियोजन मंडळाकडून मैदानाचा िवकास करू, असा शब्द त्यांनी दिला होता. त्यानुसार या मैदानाच्या अंदाजपत्रकास महापालिकेच्या स्थापत्य समितीमध्ये मंजुरी मिळाली आहे. सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानंतर जिल्हा नियोजन विकास मंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. मैदानाच्या निधीकरिता वेगवेगळ्या मार्गाने तरतूद करून या मैदानाचा सर्व सोयींनीयुक्त विकास पूर्ण करण्याचा मानस आहे. प्रणितीशिंदे, आमदार

मैदानावर तालुका क्रीडा कार्यालय करण्यात येईल
^आमदारप्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून मैदानाचा विकास होत असेल तर चांगलेच आहे. या सोयी-सुविधा झाल्यास नाममात्र प्रवेश शुल्क आकारून मैदानावर प्रवेश देण्यात येईल. त्यातून या मैदानाच्या मिळणाऱ्या भाडेपट्टीतून दुसरा सुरक्षारक्षक नेमण्यात येईल. सध्या तालुका क्रीडाधिकारी पद रिक्त आहे. हे पद मिळाले तर उत्तर, दक्षिण अक्कलकोट तालुक्यासाठी या मैदानावरच तालुका क्रीडा कार्यालय करण्यात येईल. त्यामुळे मैदानही सुरक्षित राहील. भाग्यश्रीबिले, जिल्हा क्रीडाधिकारी

दुसरा टप्पा (१ कोटी)
लेडीजटॉयलेट ब्लॉक, शेड, जिम्नॅशियम हॉल, पार्किंग एरिया, इंटर्नल रोड, लॉन डेव्हलपमेंट, पाणी बाहेर जाण्यासाठी पाइप कलव्हर्ट आदी कामांचा यात समावेश आहे.
पहिला टप्पा (१.२ कोटी)
गेट,कंपौंडवाॅल चेनलिंग फेन्सींग, धावण्याचा ट्रॅक, साइड ड्रेनेज, जॉगिंग ट्रॅक, साइड बुशेस, खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉलची क्रीडांगणे, टॉयलेट ब्लॉक, पाण्याची टाकी, बोअर पंपसहीत.

कमीत कमी दोन सुरक्षा रक्षकांची गरज
२४तास सुरक्षारक्षक नसल्यामुळे नेहरू नगर येथील मैदानाची अशी स्थिती झाली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाने एकच सुरक्षा रक्षक नेमला आहे. तो २४ तास कशी याची सुरक्षा करणार. ज्या आहेत त्या सोयी सविधा टिकविण्यासाठी तेथे कमीत कमी दोन सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे. जिल्हा नियोजन विकास मंडळातून या मैदानाचा विकास झाला तर त्यासाठी याची नितांत गरज भासणार आहे.
कोटी लाख रुपयांचेसुधारित अंदाजपत्रक मनपाने आता तयार केले आहे.
कोटी ६६ लाख रुपयांचेअंदाजपत्रक महापालिकेने सुरवातीस तयार केले हाेते.
२०११ मध्येजॉगर्स क्लबने आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन दिले.
कोटी लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. स्थापत्य समितीचीही मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर पालिकेच्या सर्वसाधारण बोर्डाच्या मंजुरीस जाईल. शेवटी जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात होण्याची आशा आहे. आपला मतदारसंघ नसतानाही प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी पाठपुरावा सुरू केला.