आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी रंजितकुमार यांनी घेतला पदभार, सांगितले- मी लोकांसाठी २४ तास उपलब्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘मी लोकांसाठी २४ तास उपलब्ध अाहे. कुठल्याही माध्यमातून भेटा. प्रत्यक्ष या, स्वागतच अाहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक या माध्यमातूनही भेटा. लोकसंपर्कावर भर देऊनच काम करणार’, अशी ग्वाही नवे जिल्हाधिकारी रंजितकुमार यांनी सोमवारी सोलापूरकरांना दिली.
अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांच्याकडून रंजितकुमार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील दुष्काळ, जलयुक्त शिवार, स्मार्ट सिटीतील समावेश, राष्ट्रीय महामार्ग, एनटीपीसीचे पाणी आदी विषयांवर ते बोलले. कोणत्याही गोष्टीत मागे राहणार नाही. काही ठिकाणी महापालिकेशी समन्वय ठेवून काम करावे लागेल. हा समन्वय सकारात्मक असेल, असे रंजितकुमार म्हणाले. या वेळी प्रवीण देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण उपस्थित होते.

रंजितकुमार २००८च्या बॅचमधील
२००८ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत रुजू झाले. प्रथम साताऱ्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर हिंगोली, नाशिक आणि गडचिरोली येथे काम केले. गडचिरोलीसारख्या नक्षलप्रभाव क्षेत्रात पावणेतीन वर्षे काम करताना त्यांनी कौशल्य विकासावर मोठा भर दिला होता. त्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार झाला. त्यानंतर ते सोलापूरला आले.

जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न
गडचिरोलीत रोजगाराचा मोठा प्रश्न अाहे. त्यामुळे तेथील तरुण भरकटल्या अवस्थेत नक्षली कारवायांकडे आकृष्ट होताे. अशा युवकांत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कौशल्य विकासावर भर देत काम केले. त्यातून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न झाले. त्याला बऱ्यापैकी यशही आले. अशाच पद्धतीचे काम सोलापुरातही करणार असल्याचे रंजितकुमार यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हमाले नवे जिल्हाधिकारी रंजित कुमार....
- मुंढे अन् रंजितकुमार
बातम्या आणखी आहेत...