आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन डी-मार्ट परिसरात वाढले अपघात, 3 दिवसांत एकाचा बळी, दोघे जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जुनापुणे नाका ते जुना तुळजापूर नाका या सर्व्हिस रोडवरील नवीन डी मार्टजवळच्या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रोज किमान एक-दोन तरी किरकोळ अपघात होतात. दोन दिवसांपूर्वी कारच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. सोमवारी दोन दुचाकींची धडक बसून दोघेजण जखमी झाले. वाहनचालकांनी वाहतूक शिस्त पाळल्यास हे अपघात कमी होतील.

सम्राट चाैकातून पंधे काॅलनीकडून, जुना पुणे नाका ते डी मार्ट अथवा रस्त्याच्या डाव्या बाजूच्या बोगद्यातून तीन चाकी, चार चाकी, दुचाकी वाहने डी मार्टच्या दिशेने येतात. सर्व्हिस रस्ता असला तरी त्या ठिकाणी वाहने चुकीच्या दिशेने येतात अन् अपघात होतो. तुळजापूर नाका दिशेने येणारी वाहने भरधाव असतात. त्यामुळे वेगावर नियंत्रण येत नाही. किमान या ठिकाणी गतिरोधक लावता येईल का? याबाबत विचार व्हावा, अशी मागणी या भागातील नागरिक, रिक्षाचालक यांनी केली आहे.
या भागात मोबाइल हिसकावण्याचे प्रमाणही वाढले आहे. महिला, तरुण, तरुणी, नागरिक मोबाइलवर बोलत थांबतात, ये-जा करतात. अशा वेळी दुचाकीवरून अालेले तरुण मोबाइल हिसकावून नेतात. पण, या घटना पोलिसांपर्यंत येत नसल्यामुळे त्याची तीव्रता समोर येत नाही.

अाजपासून नेमणार पोलिस
नवीनडीमार्ट भागातील वाढते अपघात टाळण्यासाठी, चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. बुधवारपासून ही कारवाई मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या ठिकाणी खास पोलिस नेमून शिस्त लावण्यात येईल. नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळावी. सुनीलघार्गे, वाहतूक पोलिस निरीक्षक