Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» New Local Coaches For All Passenger Trains

सर्वच पॅसेंजर गाड्यांना नवीन लोकल डबे; लवकरच रेल्वे चालकांना प्रशिक्षण

प्रतिनिधी | Oct 09, 2017, 09:34 AM IST

  • सर्वच पॅसेंजर गाड्यांना नवीन लोकल डबे; लवकरच रेल्वे चालकांना प्रशिक्षण
सोलापूर- सोलापूर-पुणे पॅसेंजरला आधीच्या डब्यांच्या ठिकाणी आता लोकलचे डबे वापरणे सुरू झाले आहे. उरलेल्या सोलापूर -रायचूर पॅसेंजर, सोलापूर -गदग पॅसेंजर, सोलापूर -फलकनामा पॅसेंजर, सोलापूर -विजापूर पॅसेंजर आदी गाड्यांचे जुनाट डबेही बदलण्यात येणार आहेत. त्यांनाही लोकलचे डबे वापरण्यात येणार आहेत.

एक ते दोन महिन्यात हा बदल होईल. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. हे डबे चेन्नई येथील रेल्वेच्या कारखान्यात तयार केले जात आहेत. लोकलचे डबे जोडल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना अडचणीचे ठरून प्रवाशांच्या प्रतिसादावर परिणाम होईल, अशी भीती प्रवासी संघटनेकडून व्यक्त केली जात होती. मात्र लोकलचे डबे आकर्षक तर आहेतच शिवाय सुविधांनी युक्त आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या प्रतिसादावर तसूभरदेखील परिणाम झालेला नाही.

रेल्वे चालकांना विशेष प्रशिक्षण
लोकल चालवण्यासाठी रेल्वे चालकांना वेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज असते. या महिन्याच्या अखेरीस १५ ते २० चालकांना प्रशिक्षणासाठी विजयवाडा येथे पाठविण्यात येणार आहे. ते १५ दिवसांचे प्रशिक्षण असेल.

बदल चांगला
रेल्वे मंडळाच्या निर्णयाप्रमाणे पॅसेंजरचे डब्यांच्या ठिकाणी लोकलचे (डेमू) डबे वापरले जाणार आहेत. यासाठी ऑक्टोबर अखेर चालकांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. हा बदल प्रवाशांच्या दृष्टीने हे फायदेशीरच ठरेल.
- शिवाजीकदम, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता, सोलापूर

Next Article

Recommended