आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीसाठी लवकरच नवे धोरण : सदाभाऊ खोत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्डुवाडी - शेतीमाल विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांकडून आडत कमिशन घेता खरेदीदाराकडून घेण्यात यावे, या सरकारच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे शासनाने यासाठी समितीची स्थापना केली आहे. दि. ऑगस्ट रोजी याचा अहवाल येताच व्यापारी, बाजार समितीचे अस्तित्व माथाडी, हमाल यांच्यासाठी अंतिम धोरण निश्चित होणार असल्याचे कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

कृषी पणन मंत्री सदाभाऊ खोत प्रथमच माढा तालुका दौऱ्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष दीपक भोसले, तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, सिद्धेश्वर घुगे, महावीर सावळे, नामदेव भोसले, सुहास पाटील, अमोल खोत, बळीराम गायकवाड, कालिदास सातपुते, बापू दगडे, एकनाथ सुर्वे उपस्थित होते.

खोत म्हणाले, फळबागा पीक विमा भरण्यासाठीची मुदत संपली असून ती दि. ३१ जुलै तर इतर पीक विम्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत वाढीसाठी मुख्यमंत्री, सहकार महसूल मंत्र्याबरोबर चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल. देशाला स्वतंत्र मिळाले मात्र शेतकऱ्यांना मिळाले नाही. आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या बाजूने धोरणे राबवली नाहीत. आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेताच ओरड सुरू केली आहे. हे निर्णय त्यांनी घेतले नाहीत.

योजनांचे विलिनीकरण करणार : कृषी खात्याच्या अनेक योजना आहेत. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. यासाठी काही योजना एका योजनेमध्ये विलिनीकरण करून एक योजना करणे जास्त गरज असलेल्या योजनेसाठी अधिक निधी देऊन अधिकाधिक शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही श्री. खोत यांनी या वेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...