आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालगाड्या झाल्या अजगरासारख्या लांबलचक : रेल्वेचा नवा प्रयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरते दौंडदरम्यान एकेरी रेल्वेमार्ग आहे. प्रवासी गाड्यांमुळे मालगाड्यांना रुळ मोकळा होण्यासाठी वाट पाहात थांबावे लागते. त्यामुळे माल पोचण्यासाठी अधिक वेळ लागतो. यावर उपाय म्हणून दोन मालगाड्या एकत्र करून धावण्याचा पर्याय सोलापूर विभागाने शोधला आहे. यास ‘पायथन सिस्टिम’ म्हणतात.
एका मालगाडीत ४२ ते ५८ वाघिणी असतात. दोन मालगाड्या एकत्र केल्याने त्यांची लांबी किमान दीड किलोमीटरची होते. पायथन हा अजगराचा प्रकार असून त्याची लांबी प्रचंड असते. त्यामुळे या पद्धतीस पायथन नाव देण्यात आले आहे. तसेच याला मारुती पद्धत म्हणूनही नाव दिलेले आहे.

सेक्शनच्या क्षमतेनुसार ४२ रेल्वे गाड्या धावू शकतात. मात्र रोज त्यापेक्षा दुप्पट म्हणजे ९८ रेल्वेगाड्या धावतात. मार्ग एकेरी, गाड्या अधिक अशा स्थितीत मालगाड्यांना धावण्यासाठी मार्गच उपलब्ध होत नाही. त्यांना ठिकठिकाणी थांबून ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. परिणामी माल पोहचण्यास उशीर लागतो. रेल्वे प्रशासन दोन मालगाड्यांना एकत्र करून सोडत आहे. यासाठी रेल्वेने विशेष काळजी घेतली आहे. दर्जाच्या रेल्वे चालकाची नियुक्ती केली आहे.
याचे फायदे दोनगाड्या जोडल्याने चार इंजिनची मदत लागते. ११६ वाघिणीतून १० हजार टन मालाची वाहतूक होऊ शकते. सोलापूरहून दौंडला जाण्यासाठी मालगाडीला साधारण आठ ते दहा तास लागतात. पायथनमध्ये चार ते पाच तासात गाड्या पोहचतात. दोन गाड्या एकत्रित केल्याने गाड्यांचा वेळ वाचतो. कमी कर्मचारी लागतात. इंधनात बचत होते.
वेळेची, इंधनाची बचत
परिचालनचेव्यवस्थापक नर्मदेश्वर झा आणि मी यावर काम केले आहे. पायथनमुळे मालगाड्या लवकर जातात. माल वेळेत पोहचवण्यास मदत होते. यामुळे वेळेची इंधनाची बचत होते.” शिवाजीकदम, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता
बातम्या आणखी आहेत...