आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिलाटीला नवे रेल्वे स्थानक, 3 महिन्यांत काम- २० कोटी रुपयांचा खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तिलाटी(ता. दक्षिण सोलापूर ) रेल्वे स्थानकाची जागा बदलून नवीन जागेत तिलाटी स्थानक होत असून याला बी वर्गाचा दर्जा मिळाला आहे. यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. मार्च अखेर नवीन स्थानक बांधले जाईल.

तिलाटी, बबलाद होशिहोंडगळ येथे असलेले सिझर क्रॉस ओव्हर म्हणजेच सिझर कटिंग काढून त्या ठिकाणी नव्याने लूप लाइन टाकण्यात येणार आहे. यालाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे सुमारे २० ते २५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

एनटीपीसी अन्य सिमेंट कंपन्यांना मालवाहतुकीसाठी स्लायडिंग टाकावी लागणार आहे. स्लायडिंग टाकल्याशिवाय रेल्वे वाहतूक सुरू होणार नाही. त्यामुळे रेल्वे दुहेरीकरणाच्या कामात सध्याचे तिलाटी स्थानक हटवणे क्रमप्राप्त होते. सध्याच्या तिलाटी स्थानकाच्या थोड्या अंतरावरच नवीन स्थानक उभारले जात आहे. नवीन तिलाटी स्थानकात फलाटासह अन्य सुविधा देण्यात येणार अाहे. पूर्वी तिलाटी स्थानक रोड साइड स्थानक होते. आता याचा दर्जा वाढला आहे. न्यू तिलाटी स्थानक आता दर्जाचे स्थानक होणार आहे. याचे काम सुरू झाले आहे. तीन महिन्यात हे काम संपण्यात येणार आहे.

सिझर क्रॉस ओव्हर म्हणजे काय?
सोलापूरहूनगुलबर्गाकडे जाताना तिलाटी, बबलाद होशिहोंडगळ अशी स्थानके येतात. या स्थानकाजवळ सिझर क्रॉस ओव्हर आहे. दोन रेल्वे गाड्या येत असतील तर एका रेल्वेला जाण्यास दुसऱ्या गाडीस उलट्या दिशेने पाठीमागे यावे लागते. अन्य ठिकाणी दोन गाड्या एकमेकांसमोर येत असतील तर एक गाडी क्रॉसिंगला थांबते. मात्र, या ठिकाणी रेल्वे उलट्या दिशेने पाठीमागे येते. समोरची गाडी निघून गेल्यानंतर पाठीमागे आलेली गाडी पुढे जाते. यात सुमारे २० ते २५ मिनिटांचा वेळ जातो. आता मात्र येथे नवीन रेल्वेची लाइन टाकण्यात येणार आहे. या लाइनवरून गाडी कोठेही थांबता थेट धावेल. यालाच लूप लाइन असे म्हणतात.

नवीन स्थानक तीन महिन्यांत पूर्ण
नवीन तिलाटी स्थानक बांधण्याचे काम हाती घेतले. ते पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी लागेल. यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च होईल. तसेच सिझर क्रॉस ओव्हरचे काम होणार आहे. यामुळे प्रवास कमी वेळेचा होईल. राजूभडके, वरिष्ठ बांधकाम अभियंता, रेल्वे विभाग, सोलापूर