आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६ कोटी खर्चून पहिल्यांदा रस्ते होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर - दक्षिणसोलापूर तालुक्यातील २६ कोटी रुपयांच्या विविध रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ रविवारी सकाळी दहा वाजता कुरघोट येथे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होत आहे.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार अॅड. शरद बनसोडे, आमदार रामहरी रूपनवर, दत्तात्रय सावंत प्रशांत परिचारक, पंचायत समितीचे सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे कुरघोटचे सरपंच बनसिद्ध बन्ने उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केंद्रीय मार्ग निधीतून तालुक्यातील ३० कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामाचा सोलापुरातून शुभारंभ झाला होता. आता पुन्हा २६ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ होत आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या प्रयत्नामुळे एका वर्षात ५६ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे तालुक्यात सुरू होत आहेत. गेल्या अनेक वर्षांत प्रथमच तालुक्यातील रस्त्यांसाठी इतका मोठा निधी मिळाला आहे. अर्थसंकल्प तरतूद, नाबार्ड, जिल्हा वार्षिक निधी गौणखनिज विकास निधीतून ही कामे होणार आहेत. एका वर्षात ही सर्व कामे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे भीमा नदीकाठासह परिसरातील दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांना तूर्तास तरी आनंद व्यक्त होत आहे.
माळकवठा ते निंबर्गी दोन कोटी, बरुर ते नांदणी एक कोटी, होनमुर्गी गावाजवळचा भाग एक कोटी, कुरघोट ते माळकवठा दोन कोटी, बरुर गावाजवळचा भाग दीड कोटी, बरुर ते टाकळी आठ कोटी, मंद्रूप- निंबर्गी रस्ता दीड कोटी, निंबर्गी ते कंदलगाव एक कोटी, मंद्रूप ते वांगी दीड कोटी, माळकवठा ते नांदणी रस्ता १५ लाख, नवीन टाकळी ते चिंचपूर रस्ता ३० लाख, भंडारकवठे ते कुसूर ६० लाख, तेलगाव ते कंदलगाव भाग विंचूर ते भंडारकवठे भाग एक कोटी ९५ लाख, शंकरनगर ते कुसूर एक कोटी ९५ लाख, निंबर्गी ते भंडारकवठे एक कोटी ९५ लाख.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कुरघोटला आज रस्ते कामाचा होणार शुभारंभ
माढ्यात मरणकळा :
वाढलेल्याखड्ड्यांमुळे कुर्डुवाडी-बार्शी रस्त्याची पूर्णत: 'वाट' लागली आहे. त्यामुळे होणाऱ्या अपघातांच्या भीतीपोटी दररोज हजारो वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत अाहे. याचे कसलेही सोयरसुतक सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसत नाही.
बातम्या आणखी आहेत...