आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार पेठ, रुपाभवानी, बाळीवेस येथे ३९ रोधक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील असलेल्या जीवघेण्या गतिरोधकांबद्दल नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात अाहे. ते सुरक्षिततेसाठी अाहेत की अपघाताला अाहेत असा प्रश्न समोर येत अाहे. याकडे महापालिका गांभीर्याने पाहणार अाहे की नाही?

शनिवारी बुधवारपेठ, मंगळवार पेठ, सम्राट चाैक, प्रभाकर महाराज मंदिर रस्ता, वर्धमाननगर, रूपाभवानी रस्ता ते मराठावस्ती, कृषी भवन कार्यालय, बाळीवेस, बलिदान चाैक, टिळक चाैक या मुख्य अंतर्गत रस्त्यांची पाहणी ‘दिव्य मराठी’ चमूने केली. सुमारे ३९ गतिरोधक अाढळले. एकाही ठिकाणी माहिती फलक, रिफ्लेक्टर, पांढरे-पिवळे पट्टे नाहीत.

संपूर्ण मार्गावरील दुचाकी प्रवास धोकादायक अाहे. नवीन माणूस जर या परिसरातील मार्गावरून ये-जा करीत असेल तर त्याला गतिरोधकाचा अंदाज येणार नाही. रूपाभवानी मंदिर, सिद्धेश्वर वुमेन पॉलिटेक्नीक काॅलेज ते बलिदान चाैक अाणि मधला मारुती या मार्गावर एकही गतिरोधक नाही. मधला मारुती, टिळक चाैक ते शिवाजी चाैक या मार्गावर पाच गतिरोधक अाहेत.

पहिले छायाचित्र दयानंद काॅलेजजवळचे. हे गतिरोधक इंच उंचीचे आहे. नियमानुसार गतिरोधकाची उंची इंच असणे आवश्यक आहे. दुसरे छायाचित्र बुधवार पेठ परिसरातील आहे.
Áएकही गतिरोधक नियमानुसार म्हणजे एमएमचे नाहीत

Áरिफ्लेक्टर अथवा रंग मारले नाहीत.
Áमराठा वस्ती भागात गतिरोधकामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याचे सांगण्यात अाले
Áगतिरोधक अाहे म्हणून सूचना देणारे फलकच नाहीत
Áचंडक पाॅलिटेक्निक, मंत्री-चंडक काॅलनी, प्रभाकर महाराज मठ, बाळीवेस रस्ता भागात गतिरोधकाची गरज पण, नियमानुसार पाहिजे.

तुम्हीही पाठवा या भागातील फोटो
जीवघेणे गतीरोधक यावर ‘दिव्य मराठी’ने ‘डीबीस्टार’च्या माध्यमातून प्रकाश टाकला. नियमानुसार गतिरोधक लावण्यासाठी नागरिकांतून संताप होत अाहे. कुणीही सांगायचे महापालिका गतिरोधक लावायचे असे प्रकार शहरात झालेत. रविवारी अामचे प्रतिनिधी गांधीनगर, हैदराबाद रस्ता परिसर, मार्केट यार्ड, शेळगी, कोंडानगर, एसव्हीसीएस, पूर्व भागातील गतिरोधकाची पाहणी करतील. याशिवाय अापल्या परिसरातील गतिरोधकाची माहिती फोटो काढून व्हॉट्सअॅप करा अथवा मेसेजव्दारे माहिती द्या. फोटो पाठविताना परिसर कुठला अाहे. अापले नाव, काही प्रसंग यापूर्वी उद्भवलेत का याची थोडक्यात माहिती सांगा. (व्हाॅट्सअॅपचा नंबर - ९७६५५ ६२८९२).

महापालिकेच्या निदर्शनास अाणू
^जोडभावी,जेलरोड, एमअायडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गतिरोधकाची पाहणी करून ते नियमाप्रमाणे अाहेत काही नाही पाहू. नसल्यास महापालिकेला पत्र पाठवून कळवू. सोमवारी प्रत्यक्षातही भेट घेतो. नियमानुसार गतिरोधक पाहिजेच.'' सुनील घार्गे, वाहतूकपोलिस निरीक्षक