आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षाच्या पहिल्या दिवशी विडी घरकुल झाले वाय-फाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : हैदराबाद रस्त्यावरील संपूर्ण विडी घरकुल आणि परिसर नववर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच ‘वाय-फाय’झाला. प्रभाग क्रमांक 10  आणि 11 चा संपूर्ण परिसर त्याच्या रेंजमध्ये आला आहे. या भागाचे नेतृत्व करणारे महेश कोठे यांनी युवकांना ही नववर्षाची भेट दिली. यामुळे आधीच ‘जिआे’च्या डिजिटल लाइफमध्ये असणाऱ्या युवकांचे चेहरे आणखी उजळून निघाले. 
 
विडी आणि यंत्रमाग कामगारांची मुले खूप हुशार आहेत. हलाखीच्या स्थितीत शिकून अनेक तरुण पुण्याच्या आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर गेले. परदेशातही चुणूक दाखवली. अशी अनेक गरजू मुले या भागात शिकतात. त्यांना आधुनिक सुविधांद्वारे घरबसल्या जग पाहता यावे, दहावी-बारावीनंतर काय? याची नेमकी दिशा ठरवता यावी, उच्च शिक्षण, नोकरीच्या संधी, शासकीय योजनांची माहिती, ऑनलाइन दाखले आणि खरेदी करता यावी, यासाठीच ही अाधुनिक सुविधा दिली.
 
युवकांनी चांगल्या कामासाठीच त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. कोठे यांनी केले. डी-व्हाइस या कंपनीची फ्रँचायझी घेतलेल्या प्रभू कमटम यांनी वाय-फायची यंत्रणा उभी केली. ३१ डिसेंबरच्या रात्री त्याची चाचणी घेतली. जानेवारीपासून त्यास सुरुवात झाली.
पुढील स्लाईडवर सविस्तर बातमी वाचा... 
बातम्या आणखी आहेत...