आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचा खर्च टाळून पाच गरीब मुलींच्या नावाने ठेवली मुदत ठेव, सोलापुरातील माेहिते नवदापंत्याचा अादर्श

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वारेमाप खर्च करून अनेक शाही विवाह पार पडताना दिसतात. यात हौसेखातर पाण्यासारखा पैसा खर्च केला जाताे. मात्र, प्रतिष्ठा बाजूला ठेवून विधायक कामासाठी वेगळी वाट चोखाळणारे एखाद दुसरेच असतात. सोलापुरातील नवदापंत्य प्रसाद व अनू मोहिते यांनी हा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी आपला विवाह सामुदायिक सोहळ्यात करून गरीब पाच मुलींच्या नावे काही रक्कम एफडी केली आहे.

समाज कार्याची आवड असलेले प्रसाद आणि अनू यांचा नुकताच आंतरजातीय विवाह झाला आहे. विवाहपूर्वीपासून  हे दोघे मिळून सोलापूर जिल्हा परिषद आवारातील मार्केट पोलिस चौकीजवळ वंचितांची शाळा चालवतात. यात भटक्या, पालवरचे जीवन जगणाऱ्या आणि शिक्षणापासून दूर असलेल्या मुलांना शिक्षण देण्यात येते. त्यांना शिक्षण, चांगले संस्कार शिकवले जातात. हे काम करताना या मुलांची हलाखी परिस्थिती या दोघांनी पाहिली आहे. दरम्यान प्रसाद आणि अनू यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपला विवाह साध्या पद्धतीने करून वंचितांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलींच्या नावाने पैसे ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.  

ठरवल्याप्रमाणे या दाेघांनी सामुदायिक साेहळ्यात विवाह केला. वाचलेल्या पैशातून त्यांनी वंचितांच्या पाच मुलांच्या नावाने पाच, तीन आणि दोन हजार रुपयांची ‘एफडी’ केली आहे. त्या प्रमाणपत्र मुलींच्या कुटुंबाकडे सुपूर्द केले. ‘लग्नाची हौस एका दिवसापुरती असते. मात्र,  खर्च टाळून तोच पैसा गरजूंच्या नावाने केल्याने या मुलींच्या जीवनाला किंचितसा आधार मिळेल, हा हेतू ठेवून सामुहिक विवाह सोहळ्यात अाम्ही लग्न केले. त्यातील पैसे पाच मुलींच्या नावाने केले,’ असे प्रसाद मोहिते यांनी सांगितले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...