आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर : जिल्ह्यात 92.47 % उत्तीर्ण, यंदाही मुलीच; रोहित, प्रणिता, केशवला 100 टक्के गुण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एस. आर. चंडक प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थिनींनी निकाल लागल्यानंतर असा जल्लोष केला. - Divya Marathi
एस. आर. चंडक प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थिनींनी निकाल लागल्यानंतर असा जल्लोष केला.
सोलापूर - यंदाही राज्याबरोबर जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली. जिल्ह्याचा निकाल ९२.४७ टक्के एवढा लागला. काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती. अखेर मंडळाकडून निकाल घोषित केल्याने अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका २४ जून रोजी संबंधित शाळेत मिळतील. 
 
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च २०१७ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल जाहीर झाला आहे. पास होणाऱ्यांच्या तुलनेत अकरावीसाठी उपलब्ध जागा ५८ हजार १६० जागा आहेत. त्यामुळे सर्वांना प्रवेश मिळणार आहे. गतवर्षी सोलापूरच्या निकाल ९१.६८ टक्के लागला होता. परंतु यंदा जिल्ह्याच्या निकालाचा टक्का ०.७९ टक्क्याने वाढला आहे. मोहोळ तालुक्याने निकालाची परंपरा कायम राखली आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत मोहोळची टक्केवारी ९५.४५ टक्के इतकी आहे. इतर तालुक्यांतील निकालापेक्षा मोहोळची टक्केवारी जास्त आहे. जिल्ह्यातून एकूण ६६ हजार १०७ विद्यार्थी दहावी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ६१ हजार १२६ विद्यार्थी पास झाले आहेत. 
 
रोहितचे यश सुयश 
सुयश विद्यालयाच्या रोहित पाटीलने अभ्यासात खूप मेहनत घेतली. रोहितचे यश हे सुयशच्या उज्ज्वल परंपरेचेच यश असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. रोहित रोज चार ते पाच तास अभ्यासाला द्यायचा. वाचन, चिंतन आणि मनन अशा तणावविरहित वातावरणात पेपर दिले. त्यामुळेच हे यश मिळाल्याचे रोहित पाटील याने सांगितले. 

प्रणिता शाळेत प्रथम 
मॉडर्न हायस्कूलच्या प्रणिता देशपांडे हिनेही प्रत्येक विषयात १०० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला. शाळेचा निकाल ९८.३४ टक्के लागला आहे. ९० टक्क्यांच्या पुढे ११, विशेष योग्यता ५२ तर प्रथम श्रेणीत ६६ विद्यार्थी आले. 

केशव तबलावादक 
नियमित अभ्यास आणि कलेच्या साधनेमुळे तणावविरहित होतो. पेपरच्या आदल्या रात्रीदेखील तबल्याचा रियाज केला. १०० टक्के गुण मिळणे ही त्याचीच परिणती असल्याचे ज्ञानप्रबोधिनीच्या केशव काबरा याने म्हटले. 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 
>प्रवेश प्रक्रिया
>विडी कामगाराच्या मुलीला ९४.६० टक्के 
>धुणीभांडी करणाऱ्या पालकांच्या तंजिलाचे यश 
बातम्या आणखी आहेत...