आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वी निराेप समारंभाला निघालेल्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा - मंगळवेढा तालुक्यातील रहाटेवाडी ते माचणूर रस्त्यावर गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात इयत्ता दहावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. शाळेतील निरोप समारंभाला उपस्थित राहण्यासाठी मोटारसायकलवर दोघेजण निघाले होते. मात्र, शाळेचा निरोप घेण्याएेवजी आयुष्याचा निरोप घेण्याची दुर्दैवी वेळ त्या मुलावर आली.
 
संकेत रामचंद्र पुजारी (वय १६, रा. तामदर्डी, ता. मंगळवेढा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अनिकेत तानाजी जाधव (वय १६, रा. रहाटेवाडी) हा जखमी झाला आहे. संकेत अनिकेत जाधव हे माचणूर येथील श्री. सिद्धेश्वर विद्या मंदिर प्रशालेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होते. शुक्रवारी शाळेने निरोप समारंभ ठेवला होता. निरोप समारंभाला उपस्थित राहण्यासाठी दोघेजण मोटारसायकलवरून निघाले होते.
 
 रहाटेवाडी ते माचणूर रस्त्यावरून जात असताना समाेरून आलेल्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
उपचारादरम्यान संकेतचा मृत्यू झाला, तर अनिकेतवर उपचार सुरू आहेत. संकेतच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. तामदर्डीचे माजी सरपंच रामचंद्र पुजारी यांचा संकेत मुलगा होता. 
 
बातम्या आणखी आहेत...