आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयांत अर्जासाठी गर्दी, अकरावी प्रवेश, विद्यार्थी, पालकांची लगबग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अकरावीचे प्रवेश अर्ज घेण्यासाठी विक्रीच्या पहिल्याच दिवशी पालकांची लगबग शहरातील विविध महाविद्यालयांतून दिसून आली. 
अर्ज २७ जूनपर्यंत उपलब्ध असतील. २४ जूनपासून अर्ज स्वीकारले जातील. दहावीची गुणपत्रिका शाळा सोडल्याचा दाखला यांच्या सत्यप्रती देणे आवश्यक आहे. जून रोजी गुणवत्तायादी प्रत्येक महाविद्यालयात लागणार आहे. 
 
९० टक्केच्या वर गुण असतील तर पसंतीच्या महाविद्यालयात सहज प्रवेश मिळेल, अशी स्थिती आहे. कारण मागील वर्षी पहिली गुणवत्तायादी ९० टक्क्यांवर लागली. यंदाही तसाच निकाल लागला असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत एक दोन टक्क्यांच्या फरकाने गुणवत्तायादी लागेल, अशी शक्यता आहे. विज्ञान शाखेसाठी वालचंद, इंडियन मॉडेल स्कूल ९२ टक्के तर संगमेश्वर ९० आणि दयानंद ८७ टक्क्यांवर पहिली गुणवत्तायादी होती. ८५ ते ७५ टक्के असतील तर पसंतीच्या महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश मिळेल. त्या खाली असतील तर कला शाखेची निवड करावी लागेल. अर्ज भरताना शाखा आणि महाविद्यालयांची निवड अभ्यासपूर्वक करावी, काहीना मनपसंत शाखा मिळेल, काहीना मिळणार नाही. काहीना मनपंसत महाविद्यालय मिळेल, काहीना मिळणार नाही. पण मनपसंत महाविद्यालयातच प्रवेशाचा हट्ट धरण्यापेक्षा मनपसंत शाखेला प्राधान्य द्यावे. कारण महाविद्यालयात दोन ते तीन वर्षच शिक्षणासाठी असतात. मात्र निवडलेल्या शाखेत संपूर्ण करिअर असते. ही बाब लक्षात ठेवून शाखा महाविद्यालय निवडावे. अन्यथा ऐनवेळी अडचण होऊ शकते. 

तीन ते चार कॉलेजमधून अर्ज घेतले 
^मुलाच्या प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी तीन ते चार महाविद्यालयांतून अर्ज घेतले. केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तर पालकांची प्रत्येक महाविद्यालयातील धावपळ थांबू शकते. याचाही विचार व्हावा.” वैशाली भिसे, पालक 

अर्जघेतला, महाविद्यालये पाहिली 
^वेगवेगळ्या महाविद्यालयातून अर्ज विकत घेतला. त्यानिमित्ताने महाविद्यालय त्यातील शैक्षणिक वातावरणही पाहता येते. कॉलेजची निवड करण्यासाठी याची मदत होते, असे मला वाटते.” अभिजित राजपूत, विद्यार्थी 
 
बातम्या आणखी आहेत...