आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: शेतकऱ्यांची अन्नसुरक्षा योजना रेशन दुकानदारांच्या घशात; कोट्यधीशांना गरीब दाखवून कोट्यवधींचे धान्य उचलले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्ह्यात साडेचार लाख शेतकरी धान्य उचलत असल्याचा दावा; प्रत्यक्षात शेतकऱ्यांना योजनाच ज्ञात नाही - Divya Marathi
जिल्ह्यात साडेचार लाख शेतकरी धान्य उचलत असल्याचा दावा; प्रत्यक्षात शेतकऱ्यांना योजनाच ज्ञात नाही
उस्मानाबाद - भ्रष्टाचार मुक्तभारत हे बिरूद घेऊन निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेतूला गावपातळीपासून शहरापर्यंत कसा हरताळ फासला जात आहे, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. शासनाने राज्यातील १४ जिल्ह्यांत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपासमार होऊ नये म्हणून सुरू केलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ स्वस्त धान्य दुकानदारांनीच उचलल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शहरी भागातील कोट्यधीश राजकीय-सामाजिक, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींच्या नावावर परस्पर धान्य उचलून शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला जात आहे. स्वत:च्या नावावर धान्य उचलले जात असल्याचे अनेक प्रतिष्ठितांना ज्ञात नाही. 

शासनाने २४ जुलै २०१५ रोजी महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये (२०१५) योजनेचा प्रारंभ झाला. केशरी शिधापत्रिकाधारक असलेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षेचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने प्रतिकिलो रुपये दराने तांदूळ तर रुपये प्रतिकिलो दराने गहू, दरमहा प्रतीव्यक्ती किलोप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद तसेच अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वर्धा, अशा १४ जिल्ह्यांत ही योजना सुरू केली. त्यासाठी संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांकडून शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा मागवून घेतला. बहुतांश दुकानदारांनी आपापल्या कक्षेतील शेतकऱ्यंाचा सातबारा घेतला तर बहुतांश दुकानदारांनी सातबाराऐवजी केवळ मोघम गट क्रमांक देऊन शासनाकडे लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कळवली. मुळात ही योजना कशासाठी, कुणासाठी आहे, याची ९० टक्के शेतकऱ्यंाना अद्याप माहिती नाही. ‘दिव्य मराठी’ने गावागावात तसेच शहरी भागात माहिती घेतली तेंव्हा शेतकऱ्यांनीच ही योजना काय आहे, अशी विचारणा केली. त्यामुळे योजनेचा लाभ दुसरेच कोणी उचलत असल्याची बाब समोर आली. ‘दिव्य मराठी’ने उस्मानाबाद शहरात गरीब शेतकऱ्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत असल्याचे दाखविण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या नावाचा शोध घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार पुढे आला. विशेष म्हणजे स्वस्त धान्य दुकानात २०-२० वर्षे पाय ठेवलेल्या प्रतिष्ठित राजकीय, सामाजिक तसेच व्यापारी-उद्योग क्षेत्रातील नागरिकांच्या नावावर ही योजना स्वस्त धान्य दुकानदारांनी लाटली असून, या व्यक्तींच्या नावावर येणारे धान्य काळ्या बाजारात विकण्यात येत आहे. राज्यातील १४ जिल्ह्यात अशीच स्थिती असण्याची दाट शक्यता अाहे. ग्रामीण भागातही या योजनेचा लाभ खऱ्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. या धान्य घोटाळ्यात दुकानदारांसह पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचाही हात अाहे का, याचाही शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. 
 
काय आहे योजना 
मी कधीही मालआणला नाही किंवा या योजनेची कल्पनाही नाही. मलाच योजनेची मािहती नाही त्यामुळे सामान्य शेतकऱ्यंाना कशी माहिती असणार. हा सगळा प्रकार थांबला पाहिजे. मी आजच रेशन दुकानदाराला यासंबंधी विचारणा करणार आहे. 

प्रकाश जगताप हॉटेलरोमाचे मालक 
माझ्या कुटंुबातकेवळ रहिवाशी पुरावा म्हणून रेशन कार्डचा वापर केला जातो. धान्य आणण्याचा प्रश्नच येत नाही. माझे चुलते १३ वर्षापूर्वी मृत झाले. त्यांचेही नाव अन्नसुरक्षा यादीत असल्याने त्यांच्या नावावर माल उचलला जात असल्याने धक्का बसला. मोठा भ्रष्टाचार आहे तो थांबला पाहिजे. 

प्रदीप घोणे नगरसेवक
२० वर्षापासून मीरेशनचा माल उचलत नाही. हे सगळं बोगस सुरू आहे. कधीही माल आणत नसताना माझे नाव शेतकऱ्यांच्या अन्नसुरक्षा योजनेच्या यादीत आले कसे. बायोमेट्रिकमुळे पारदर्शकता येईल, शासनाने त्याचा जरूर विचार करावा. 

संपतराव डोके माजीनगराध्यक्ष 
माझे आजोबा शिवाजीदादासाळुंके यांचे नाव अन्नसुरक्षा यादीत. त्यांनाही माल उचलणाऱ्यांच्या यादीत असल्याचे ऐकून धक्का बसला. यामध्ये दुकानदारांसह सरकारी यंत्रणेचा हात आहे. मोठ्या व्यक्तींच्या नावावर चाललेला काळाबाजार थांबविण्यासाठी आता शिवसेना आणि युवासेना स्टाईल आंदोलन करणार आहे. 

सूरजसा ळुंके उपनगराध्यक्ष
शेतकऱ्यांसाठी अल्पदराने धान्य योजना आहे, याची माहितीही नाही. मी स्वस्त धान्य दुकानातून कधीही माल आणत नाही. अन्न सुरक्षा योजनेच्या शेतकऱ्यांच्या यादीत माझे नाव असल्याचे मला माहिती नव्हते. 
 
प्रतिष्ठित मंडळी म्हणतात; आम्ही कधीही धान्य उचलले नाही, भ्रष्टाचाराची समूळ चौकशी करा 
सतीशदंडनाईक, जिल्हाबँकेचे संचालक 
या योजनेसंबंधी मलाकाहीही माहिती नव्हते. माझ्या नावावर माल उचलला जात असल्याचे ऐकून धक्का बसला. मी कधीही रेशनचा माल आणत नाही. माझ्या नावावर माल कुणी, कसा उचलला, याची चौकशी झाली पाहिजे.हा मोठा भ्रष्टाचार आहे. 
 

नानासाहेब पाटील माजीनगराध्यक्ष 
शासनाने ३० जुलै २०१६ ला योजनेचे सोशल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. तसेच अन्न दिन साजरा करण्याच्या सूचना पुरवठा विभागाला दिल्या होत्या. शेतकऱ्यांची नावे आधार लिंक करण्यास सांगण्यात आले होते. शासन आदेशाला पुरवठा विभागाने हरताळ फासला. 
काय सांगता, माझ्या नावावर धान्य उचलले जाते? 
 
सोशल ऑडिट करण्याच्या आदेशाला हरताळ 
उस्मानाबाद शहरात ३१ स्वस्त धान्य दुकानातून शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत धान्याचे वाटप करण्यात येत आहे. सुमारे ११ हजार ९९० शेतकरी लाभार्थी आहेत. विशेष म्हणजे यामध्ये कोट्यधीश असलेले नेते, व्यापारी आहेत. मात्र,त्यांनी २०-२० वर्षे दुकानात पाय ठेवलेला नाही. तरीही त्यांच्या नावावर गरीब दुष्काळग्रस्त शेतकरी दाखवून धान्य उचलण्यात येत आहे. यापैकी प्रतिष्ठित व्यक्तींशी संवाद साधल्यानंतर त्यांनाही धक्का बसला. 
 
१४ हजार २१० गहू, हजार ४७० क्विंटल तांदूळ दरमहा येतो. 
अहवाल सांगतो.. 
ऑगस्ट-सप्टेंबर२०१५ पासून जवळपास दीड वर्षात किलोभरही शेतकऱ्यांच्या योजनेचा माल शासनाकडे परत गेलेला नाही. याचाच अर्थ सगळेच शेतकरी हा माल उचलत असल्याचे शासनाचा अहवाल सांगतो. 
 
३० दिवसांत ५ कोटींचे धान्य 
जिल्ह्यात सुमारे लाख ७३ हजार लाभधारक शेतकरी आहेत. शासनाकडून या योजनेतील शेतकऱ्यांना ऑगस्टपासून (२०१५)धान्य वितरित होते.त्याची किंमत कोटी आहे. 
विशेष म्हणजे... 

अत्यंतदर्जेदार गहू आणि तांदूळ असून, गव्हाचा २५ तर तांदळाचा ३० रुपये प्रतिकिलो शासकीय बाजारभाव आहे. शेतकऱ्यांसाठी महिन्याला जिल्ह्यात येणाऱ्या या धान्याची किंमत सुमारे कोटीहून अधिक आहे. मात्र, हे धान्य किती शेतकरी उचलतात. 
 
शेतकरी अन्नसुरक्षा योजनेत प्रतिष्ठित व्यक्तींची नावे आहेत,त्यांनी कधीही धान्य उचलेले नाही. 
- अशालोकांची नावे कळवावीत, आपण चौकशी करू. 
शेतकरीअन्नसुरक्षा योजनेत ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत, त्यांनाच याची कल्पना नाही. 
- अशाशेतकऱ्यांना माहिती मिळावी, म्हणून आपण गावस्तरावर याद्यांचे वाचन करतो. 
अनेकशेतकरी योजनेतील धान्य उचलत नाहीत, 
- अशाशेतकऱ्यांनी धान्याची गरज नाही म्हणून फॉर्म भरून द्यावा. त्यांचे नाव वगळण्यात येईल. 
पंधरावर्षापूर्वी मृत झालेल्यांची नावे शेतकऱ्यंाच्या यादीत आहेत. 
- याद्या अपडेट करण्याचे काम हाती घेतले आहे. मृत लोकांची नावे वगळण्यात येतील. 
शेतकऱ्यांसाठीआलेला माल शेतकऱ्यांनी परत नेल्यामुळे शासनाकडे परत येतो? 
- परतयेत नाही. तो दुकानदारांकडेच शिल्लक राहतो. तो पुढच्या महिन्यासाठी हस्तांतरित होतो. 
झालेल्याभ्रष्टाचाराचे काय? 
- तशीयादी मिळाल्यास कारवाई करू. 
योजनाकधीपर्यंत चालू असेल? 
- शासनाचाधोरणात्मक निर्णय आहे. सध्या तरी ही योजना सुरूच आहे. 
दीड वर्षापासून कधीही धान्य उचलणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर काळाधंदा सुरू 
 
शासनाची १४ जिल्ह्यांकरिता योजना; गहू रुपये, रुपये किलोदराने तांदळाची खरेदी 
राजकीय, सामाजिक क्षेत्रासह शहरातील हजारो प्रतिष्ठित नागरिकांची योजनेत नावे 
उस्मानाबाद येथे गरिबांच्या योजनेचा कोट्यधीशाच्या नावाखाली उठवला जातो लाभ 
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत महिन्याला येते कोटींचे धान्य, सोशल ऑडिटला हरताळ
अरविंद लाटकर, जिल्हापुरवठा अधिकारी, उस्मानाबाद 

शासकीय यंत्रणेचा सहभाग 
- मुळातही योजना लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे. योजनेत मोठ्या व्यक्तींना लाभार्थी दाखवून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. ते माल उचलतात, असे दाखविण्यात येते. म्हणजे जे व्यक्ती कधीही माल उचलत नाहीत, त्यांचा माल कोण उचलतो, याची चौकशी व्हावी, तसेच ज्यांनी धान्याचा घोटाळा केला आहे, त्यांच्याकडून वसूली व्हावी.
-अॅड.विजयसिंहमाने,सदस्य, जिल्हा दक्षता समिती 
 
२०१३ पूर्वीच्या बीपीएल गटातील सर्व लाभार्थ्यांना समाविष्ट करून घेण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रातील दुष्काळीस्थिती असलेल्या १४ जिल्ह्यातल्या एपीएलमधील (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना या योजनेतून अल्पदराने लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. 
२०१३ मध्ये शासनाने गरीब कुटुंबांना किमान दोनवेळचे अन्न मिळावे, कुणाचीही उपासमार होऊ नये, यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना सुरू केली. त्यात अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थ्यांना समाविष्ट करून घेण्यात आले होते.योजना अद्याप सुरू आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...