आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमुख पक्षांचे 50 टक्के उमेदवार ‘नॉनमॅट्रिक’, दहावीचे 67, पदवीचे 53 तर अशिक्षित उमेदवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शासनाकडून शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. समाजातील शैक्षणिक दर्जा वाढत आहे. एकीकडे पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. मात्र महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना भाजप या प्रमुख राजकीय पक्षांच्या वतीने ५० टक्के ‘नॉनमॅट्रिक’ असलेल्यांना उमेदवारी दिली आहे. 
 
निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी पाचवी नववी पास असलेले १२२ उमेदवार दिले आहेत. तर दहावी पास असलेले ६७, बारावी पास असलेले ५७ तर पदवीचे ५३, पदव्युत्तर पदवीचे १८ शिकलेले उमेदवार प्रमुख राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी उभा आहेत. काँग्रेसने पाचवीचे १५, नववीचे १७, दहावी १६, बारावी १६, पदवीचे २४, पदव्युत्तर पदवीचे तर शिकलेले उमेदवार उभे केलेले आहेत.

सर्वाधिक पदवी :पदव्युत्तरचे उमेदवार काँग्रेस पक्षाकडून उभे केलेले आहेत. राष्ट्रवादीने पाचवीचे ८, नववीचे १४, दहावी ९, बारावी ९, पदवी तर पीजे उमेदवार निवडणुकीसाठी अाहेत. 
शिवसेनेचे पाचवीचे १०, नववीचे २०, दहावी : बारावीचे प्रत्येकी १८ तर पदवीचे सात उमेदवार आहेत. भाजपकडून पदव्युत्तर पदवीचे पाच उमेदवार आहेत. नववी दहावीचे मिळून ३८ उमेदवार रिंगणात उभा आहेत. 

साधारणपणे चार प्रमुख पक्षांचे ३२६ उमेदवार निवडणुकीमध्ये उभा आहेत. या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये काही व्यावसायिक अभ्यासक्रम असलेले दोन जण आयुर्वेदिकची पदवी असलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. 

सुशिक्षितांसाठी पक्षांकडून केवळ आवाहनच राजकीय पुढारी पदाधिकारी विविध ठिकाणांच्या कार्यक्रमात सुशिक्षित पदवीधर तरुणांनी राजकारणात यावे, असे आवाहन वारंवार म्हणतात. परंतु शिवसेना, भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांतील उमेदवारांचे शिक्षण खूपच कमी आहे. शिक्षण असावे अथवा नसावे याबाबत कोणताही निकष नाही. परंतु बोले तैसा चाले, या उक्तीप्रमाणे प्रमुख पक्षामध्ये पदवीधर अथवा पदव्युत्तर शिक्षण असलेल्यांना संधी मिळावी. 
भाजप 

- पाचवी : १५ टक्के, {नववी : २३ टक्के, {दहावी : २४ टक्के, {बारावी : १४ टक्के, {पदवी : १५ टक्के, {पीजी : टक्के, {अशिक्षित टक्के 
 
राष्ट्रवादी 
{पाचवी : १६ टक्के, {नववी : २८ टक्के, {दहावी : १८ टक्के, {बारावी : १८ टक्के, {पदवी : १४ टक्के, { पीजी : टक्के 
शिवसेना 
{पाचवी : १३ टक्के, { नववी : २५ टक्के, {दहावी : २३ टक्के, {बारावी : २३ टक्के, {पदवी : टक्के {पीजी : टक्के, {अशिक्षित : टक्के 
काँग्रेस 
{
पाचवी : १५ टक्के, {नववी : १७ टक्के, {दहावी : १६ टक्के, {बारावी : १६ टक्के, {पदवी : २४ टक्के, {पीजी : टक्के, {अशिक्षित : टक्के. 
 
बातम्या आणखी आहेत...