आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारी बँकांत इतका पैसा आला, ठेवायला जागा नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर त्यांचा प्रचंड भरणा बँकांमध्ये सुरू झाला. सहकारी बँकांमध्ये हा पैसा इतका झाला की, ठेवायला जागाच नाही. दुसरीकडे सामान्य ग्राहकांना देण्यासाठी लहान नोटाही नाहीत. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका आम्हाला सहकार्य करत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना ही स्थिती सांगून मार्ग काढण्याची विनंती करणार असल्याचे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनने सांगितले.
प्रत्येक सहकारी बँक आर्थिक व्यवहारांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेशी संलग्नित असते. दोघांत निधीची देवाण-घेवाण होत असते. मंगळवारी (ता. ८) नोटा रद्द केल्याचा फतवा निघाला. त्यानंतर असा पैसा साठवून ठेवलेल्यांचे धाबेच दणाणले. मिळेल त्या मार्गाने हा पैसा जिरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोने खरेदीत गंुंतवण्याचे प्रयत्न झाले. गुरुवारपासून बँका सुरू झाल्या. तिथे रांगा लावून भरण्याचे काम सुरू झाले आहे. अशा तऱ्हेने सहकारी बँकेत प्रचंड प्रमाणात पैसा आला. परंतु त्यासोबत नवे चलन काही मिळाले नाही. शंभर आणि पन्नासच्या नोटांचा बाजारात तुटवडा निर्माण झाला. सहकारी बँकेत प्रमाणापेक्षा अधिक पैसा आला. तो ठेवायचा कुठे? असा प्रश्न आहे.
प्रतिनिधी सोलापूर
बॅँकांतनवीन नोटा येऊनही बाजारपेठेत मात्र नवीन चलन आले नाही. अनेक व्यापाऱ्यांनी या दोन दिवसात ग्राहकांकडून एकही नवी नोट आली नसल्याचे सांगितले. लग्नसराईचा हंगाम वाया जात असल्याची खंत व्यक्त केली. या काळात दरवर्षी बाजारात रेलचेल असते. यंदा मात्र शुकशुकाट आहे.

अपेक्षेप्रमाणे पाऊस झाल्यामुळे यंदा बाजारपेठेत उत्साह आहे. मात्र सरकारच्या नोटा रद्द निर्णयामुळे बाजारात खळबळ उडाली. असे असले तरी नवीन नोटा आल्यानंतर बाजार फुलेल असे उरउवाटले होते. मात्र अद्याप त्या नोटा चलनात फारशा आल्या नाहीत. बॅँकांमधून एकावेळी फक्त चार हजार रुपयेच मिळत असल्याने बाजारपेठ ठप्प आहे. ती सुरळीत होण्यासाठी एक महिना लागेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

ग्राहक येतात पण सुट्टे मागायला
दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात दुकानात माल भरला. मात्र, दिवसभरात पाच ते सहाच ग्राहक येत आहेत. त्यातलेही काहीजण सुट्टे मागायला येतात. बिलापोटी जुन्या नोटा होलसेल व्यापारी स्वीकारत नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूने कोंडी होत आहे.
-आशिष कटारे, एस. टी. स्टॅन्ड जनरल स्टोअर्स

यंत्रमाग क्षेत्रात चेक, ऑनलाइन व्यवहार
यंत्रमाग क्षेत्रात उत्पादन प्रक्रिया सुरू आहे. आमचा सर्व व्यवहार चेक आणि ऑनलाइन असल्यामुळे तसा फारसा फरक पडला नाही. मात्र शोरूमवाल्यांच्या व्यवसायावर ७५ टक्के परिणाम झाला आहे. व्यवहार पूर्ववत व्हायला वेळ लागेल.
- पेंटप्पा गड्डम, यंत्रमागधारक संघ अध्यक्ष

कापड व्यवसायावर ८० टक्के परिणाम
जुन्या नोटा रद्दनंतर दोन दिवस त्रास झाला. अजून नवीन नोटा बाजारात आल्या नाहीत. व्यवसायावर ८० टक्के परिणाम झाला आहे. - अजय दरगड, दरगड क्लॉथ सेंटर

सराफ बाजारातही शांतता
शुक्रवारी दुकाने सुरू होती. मात्र सर्व व्यवहार चेकने आणि ऑनलाइन सुरू आहे. रोखीने काहीही व्यवहार होत नाही. नवीन नोट बाजारात आल्याशिवाय काही खरे नाही. व्यवसायावर ९० टक्के परिणाम झाला आहे.
-गिरीश देवरमणी, सराफ असोसिएशन अध्यक्ष

स्टेट बँक ट्रेझरी शाखा येथील एटीएमला दिवसभर रांग
तुरळक ऑनलाइन खरेदी
^दोनदिवसांतग्राहकांकडून एकही नवीन नोट आली नाही. बोटावर मोजण्याइतके लोक ऑनलाइन शॉपिंग करत आहेत. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या हंगामात व्यवसायावर ९५ टक्के परिणाम झाला आहे. -सागर रोहिडा, शगुन सिल्क पॅलेस

गडबड कशासाठी?
जुन्यानोटा जमा करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतचा अवधी आहे. परंतु लोक थांबायला तयार नाहीत. मोठ्या रांगा लावून पैसे भरण्यासाठी येतच आहेत. त्याचा प्रचंड ताण बँकांवर पडतो आहे. त्यामुळे बँकेच्या खातेदारांनीही गडबड करू नये, असे आवाहन नागरी सहकारी बँकांनी केले आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांनी सहकार्य करावे...
^जुन्यानोटारद्द झाल्यानंतर त्यांचा भरणा सहकारी बँकेत प्रचंड प्रमाणात सुरू झाला. हा पैसा संलग्नित राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करण्यात येतो. परंतु या बँकांनी पैसे मोजण्यास माणसे नसल्याचे सांगून स्वीकारलेच नाहीत. आता हा पैसा ठेवायचा कुठे? नवीन चलन राष्ट्रीयीकृत बँकेत आले आहे. सहकारी बँका मात्र त्यापासून वंचित आहेत. त्यांना राष्ट्रीयीकृत बँकांमार्फतच नवे चलन अपेक्षित आहे. संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. दखल नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांनी भेटून मार्ग काढण्यास सांगू. -राज मिणियार, सदस्य, जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन
बातम्या आणखी आहेत...