आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या नोटांनी कर भरण्याच्या मुुभेचा आज शेवटचा दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - चलनातून पाचशे, हजारच्या नोटा रद्दचा निर्णय होऊन १३ दिवस उलटले. या १३ दिवसांत स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियाकडे पाचशे, हजारच्या नोटा स्वरूपात हजार ८३ कोटी रुपये जमा झाले, तर दोन्ही बँकांकडून जमा झाल्याच्या निम्मी ५०५ कोटी ७० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ५०७ कोटी तर बँक ऑफ इंडियाकडून ६५ कोटी ७० लाख रुपयांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेकडून स्टेट बँकेला सर्वाधिक रक्कम प्राप्त झाल्याची माहिती प्रभारी अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम यांनी दिली.
एटीएमपूर्ण क्षमतेने सुरू होण्याची प्रतीक्षा
जिल्ह्यात स्टेट बँक वगळता इतर बँकांच्या एटीएमचे शटर अजूनही खालीच आहेत. एसबीआयचे जिल्ह्यात ८९ एटीएम असून सर्व एटीएम सुरू आहेत. शहरातील एटीएममध्ये २० लाख तर ग्रामीण भागातील एटीएममध्ये १० लाख रुपये प्रतीदिन भरले जात आहेत. बाळीवेस शाखेतील एटीएममध्ये ४० लाख रुपये भरत असल्याचे मुख्य व्यवस्थापक सुहास गंडी यांनी सांगितले. बँक ऑफ इंडियाचे ११० एटीएम असून यापैकी १५ एटीएम सुरू करण्यात आले आहेत. सर्व बँकांचे एटीएम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची प्रतिक्षा आहे.

पैशांची अशी आहे स्थिती
स्टेट बँक : ५७६ कोटी जमा, ४३९.६० कोटी वितरित
बँक ऑफ इंडिया : ५०७.६४ कोटी जमा, ६५.७० कोटी वितरित

केंद्रीय निरीक्षक बिद्री घेणार आढावा
हजार,पाचशेच्या नोटा रद्द झाल्यामुळे सर्वसाधारण व्यवहार जीवनमानांवर काय परिणाम झाला, याचा आढावा घेण्यासाठी आज गुरुवारी सकाळी १०.३० वाजता केंद्रीय निरीक्षक विजयालक्ष्मी बिद्री येणार आहेत. सर्वच विभागांकडून त्या माहिती घेणार आहेत. परिणामांची माहिती संबंधित विभागप्रमुख माहिती सादर करणार आहेत.
मोबाइल एटीएममधून बारा लाख वाटप
सोलापूर | स्टेटबँक आफ इंडियाच्या बाळीवेस शाखेतून दहा दिवसांत २२ जणांनी लग्नासाठी प्रत्येकी अडीच लाख रुपये काढले. विशेष म्हणजे खातेदारांची अडचण पाहता बॅँकेनेच पोलिसांचे तपास कार्य पूर्ण करून रक्कम अदा केली. बँक खात्यातून लग्नासाठी कमाल अडीच लाख रुपये काढण्याची मुभा सरकारने दिली आहे.
हजार आणि आता दोन हजारच काढता येतात. त्यामुळे लग्न समारंभ असो किंवा घरातील इतर कार्यक्रमांसाठी पैसे नसल्यामुळे अनेकांचे हाल होते होते. लग्न असल्याची खातरजमा पोलिसांनी करावी असा नियम आहे. शेजारच्या लोकांची साक्ष पोलिस घेत होते. यात वेळ लागत होता. बँकेने सर्व पाहणी आणि चौकशी स्वत:च्या पातळीवर केली आणि रक्कम काढण्यास मुभा दिली.
सोलापूर चलनातूनबंद झालेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटांद्वारे शासकीय कर भरण्याचा शेवटचा दिवस गुरुवार आहे. महापालिका, वीज मंडळ, दूरसंचार येथे या नोटा आज चालतील. याशिवाय पंपावरही या नोटांच्या आधारे आजच इंधन भरता येणार आहे. जुन्या नोटांना मुदतवाढ रात्री उशिरापर्यंत दिली नव्हती.
जिल्हा सहकारी बँकेला नोटा स्वीकारण्याबाबत आज निर्णय
जिल्हा बँकेत पाचशे, हजारच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. याबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयास परवानगी दिली आहे. यामुळे गुरुवारी जिल्हा बँकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

^लग्नसाठी रक्कमकाढण्याचा लाभ सर्व शाखांत मिळून सुमारे ४० जणांनी घेतला. तसेच, मोबाइल व्हॅन अर्थात पीओएसला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांची अडचणही सोडवली जात आहे.” - सुहास गंडी, मुख्य व्यवस्थापक, स्टेटबॅँक ऑफ इंडिया

गरजू खातेदारांपर्यंत पैसे नेण्याकरता स्टेट बँक ऑफ इंडियाने मोबाइल व्हॅन अर्थात पीओएस (पीओएस) हे मशीन आणले. या मशीनद्वारे एसबीआय बॅँकेने गेल्या तीन दिवसांत एक हजार खातेदारांना १० ते १२ लाख रुपये दिले. केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र, राज्य राखीव दलाच्या सोरेगाव, अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल, यशोधरा हॉस्पिटल, मार्कंडेय रुग्णालय आदी ठिकाणी या मोबाइल व्हॅनचा उपयोग करण्यात आला.

मोबाईल व्हॅन अर्थात पीओएस (पॉँईंट ऑफ सेल) हे एसबीआय बॅँकेने सुरु केले. ज्यांच्याकडे एसबीआय चे एटीएम कार्ड आहेत त्यांनाच याचा लाभ होत आहे. इतर बॅँकाच्या एटीएम कार्डधारकांना याचा लाभ होणार नाही. तसेच ज्याच्या कडे एटीएम कार्ड आहे त्यालाच याचा फायदा होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...