आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा वाहून नेणाऱ्या डंपरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अाईसोबत दुचाकीवरून घरी जाताना महापालिकेच्या कचरा वाहून नेणा-या डंपरची धडक बसून झालेल्या अपघातात शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला संभाजीराव शिंदे प्रशालाजवळील सुपर मार्केटजवळ घडला. ऋषीकेश मुकूंद जोशी (वय १२, रा. बी-१२ युनायटेड विहार खमितकर अपार्टमेंटजवळ, सोलापूर) असे मृत मुलाचे नाव अाहे. तो श्राविका हायस्कूलमध्ये अाठवीत शिकत होता. 

मेघना मुकूंद जोशी यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली अाहे. सौ. मेघना या दुचाकीवरून (एमएच १३ सीएल -३७१७) भैय्या चौकातून घरी जात होत्या. पाठीमागून कचरा वाहतूक करणारी डंपरगाडी (एमएच ०६ ८९१६) येत होती. उजव्या बाजूने धडक बसल्यामुळे ऋषीकेश हा मागील चाकात सापडला तर सौ. मेघना या डावीकडे पडल्यामुळे पायाला गंभीर दुखापत झाली. पोटावरून चाक गेल्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत अश्विनी रूग्णालयात दाखल केले, तोपर्यंत ऋषीकेश याचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात अाले. अाई मेघना या सोलापूर विद्यापीठातील अारोग्य उपचार केंद्रात परिचारीका अाहेत. वडील मुकूंद हे अशि्वनी सहकारी रूग्णालयात लिपीक म्हणून काम करतात. ऋषीकेश अाठवीत शिकत होता. एक मुलगी असून ती बारावीत शिकतेय. डंपरचालक अमित सोमशेट्टी (वय २५, रा. मड्डीवस्ती) याला अटक झाली अाहे. डंपर मालक अर्जून देवकर (रा. भवानीपेठ) याच्यावरही गुन्हा दाखल झाला असून तो गायब असल्याची माहिती फौजदार रिया बोधे यांनी दिली. डंपर दुचाकी पोलिसांच्या ताब्यात अाहे. अारटीअोने दोन्ही वाहनांची अाज तपासणी केली. देवकर यांनी महापालिकेकडून कचरा उचलण्यासाठी वाहनाचा ठेका घेतला अाहे. विशेष म्हणजे अमित या चालकाकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना नसताना त्याला चालक म्हणून कामावर कसे काय ठेवले? अजून या घटनेची कामगदपत्रे तपासात अाहोत, मूळ मालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे फौजदार बोधे म्हणाल्या. 
 
अवजड वाहनांना बंदी, परवाना असलेली वाहने मात्र सुसाट, कारवाईचे वाहतूक पोलिसांचे जुजबी नाटक 
सकाळी सात दुपारी एक सायंकाळी साडेतीन ते साडेसहा यावेळेत शहरात येणारी अवजड वाहने बंद असतात. कचरा वाहतूक, पाणी वाहतूक टॅंकर, शासकीय कामांना वाळू, सिमेंट, खडी, पुरवठा करणारे डंपर, धान्य वाहतूक ट्रक यांना अत्यावश्यक सेवा म्हणून बंदी काळातही वाहतूक मुभा अाहे. पण, वाहन वेगमर्यादा प्रति तास ३० किलोमीटर पाहिजे. पण, धावतात ७०-८० च्या गतीने. यावर वाहतूक पोलिस नियंत्त््रण ठेवत नाहीत, कारवाईचे जुजबी नाटक होते. अत्यावश्यक सेवा म्हणून वाहनाच्या काचावर वाहतूक पोलिसांची परवानगी घेतलेली परवाना डकविणे गरजेचे अाहे. तसेही होत नाही. 
 
बातम्या आणखी आहेत...