आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी पाहण्यासाठी निघालेल्या मुलासह भावजयीचा अपघाती मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैराग -  मुलगी पाहण्यासाठी निघालेल्या मुलगा तसेच भावजयीचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. वैरागजवळ रविवारी सकाळी वाजता हा अपघात घडला. नरसिंह चंद्रशेखर मोहिते (वय २५) आणि राजश्री हनुमंत मोहिते (३०, दोघे रा. रस्तापूर, ता. बार्शी) अशी मृतांची नावे आहेत. 
 
नरसिंह हे गावडी दारफळ(ता. बार्शी) येथील मुलगी पाहण्यासाठी रविवारी सकाळी रस्तापूर येथून मोटारसायकलवर(एमएच १३ एआर ०२३५) निघाले होते. त्यांच्यासोबत थोरली भावजय राजश्री मोहिते होत्या. ते वैरागजवळ आले असता अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 
 
याबाबत माहिती अशी : नरसिंह चंद्रशेखर मोहिते (रा. रस्तापूर, ता. बार्शी) याला मुलगी पाहण्यासाठी स्वतः मुलगा थोरली भावजय राजश्री हनुमंत मोहिते हे दोघे MH13AR0235 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून जात असताना वैरागजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविछेदन झाल्यानंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शरद मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन पत्रे हे करत आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...