आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरच्या अमीरचा तडवळकर डोनाल्ड डकला आवाज;

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूरच्या मातीतील आणि मुंबईच्या चंदेरी दुनियेत  अभिनय करणाऱ्या अमीर तडवळकरचा आवाज आता डक टिल्सच्या या कार्टून मालिकेतील डोनाल्ड डकच्या पात्रासाठी  आंतरराष्ट्रीय स्तरावर निवडला गेला आहे. आजवर अनेकदा कार्टूनच्या  मालिकातील डोनाल्ड डकच्या पात्रासाठी ते आपला आवाज देत होते.  त्या कामाचे फलित म्हणून अमेरिकेच्या डिस्ने वर्ल्ड या कंपनीने दिल्ली व मुंबई दूरदर्शनसाठी डक  टिल्स ही नवीन मालिका सुरू केली आहे.    


येत्या काही दिवसांत ही मालिका दूरदर्शनच्या सर्वच वाहिन्यांवर दिसणार आहे. त्यामुळे बच्चे कंपनी पुन्हा एकदा मजा लुटणार असल्याचा आनंद  त्यांना  निश्चित होणार आहे. या मालिकेतील सगळ्याच  भागात अमीरचा आवाज घुमणार आहे. कारण तीन छोटे डक आणि  त्यांचे अंकल अशी याची पात्रांची पेरणी असणार आहे. त्यामुळे कधी बच्चूंच्या, तर कधी अंकल  स्क्रूचच्या रूपाने अमीर प्रत्येकाच्या भेटीला जाणार आहे.     


अशी मिळाली संधी

गेली अनेक वर्षे अमेरिकेच्या  डिस्ने वर्ल्ड या कंपनीत अमीर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण  नकलांच्या अावाजाने भरारी घेत अाहे.  अंधेरीच्या  डिस्ने वर्ल्डच्या स्टुडिओत सातत्याने आवाज देणाऱ्या अमीरला   आवाजाची शुद्धता आणि स्पष्टता या कारणाने पुन्हा ही वेगळी संधी मिळाली.   

 

श्रेय अाईवडिलांना  
‘चौथीत असल्यापासून आवाजाचे  सराव करत होतो. पुढे हा माझा जोडव्यवसाय होईल असे वाटले नव्हते आणि आज जगात जिथे जिथे हिंदी वाहिनी आहे तिथे प्रेक्षक डिस्नेचे सारे कार्यक्रम पाहतात. छोट्या रसिकांना ही मेजवानी असते. त्यांचे भावविश्व असते. त्यामुळे मी हे काम करतोय याचा मला प्रचंड आनंद आहे. याचे श्रेय आई आशालता आणि वडील अरुण यांना जाते. ते आज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.’   
- अमीर तडवळकर,  सिनेनाट्य अभिनेता,

 

बातम्या आणखी आहेत...