आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्कलकोटची प्युमोरी मेहता गाजवतेय अभिनय, नृत्याचे विश्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- नृत्यात करिअर घडवणारी अक्कलकोटची प्युमोरी अशोक मेहता-घोष. ती सध्या मालिका, चित्रपट आणि नृत्याचे विश्व गाजवते आहे. एका तालुक्यातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या या सोलापूरच्या कन्येने अभिनयाच्या आणि नृत्याच्या बळावर कोणीही कष्ट करून माणूस मोठा होऊ शकतो, याची प्रचिती दिली आहे. अनेक जाहिराती, मालिका, चित्रपट आणि लघुपटात काम करून तिने आपले चंदेरी दुनियेतले कर्तृत्व सिद्ध केले आहे. 

(कै.) डॉ. अशोक मेहता यांचे मूळ गाव अक्कलकोट असल्याने प्युमोरी लहानपणापासून अक्कलकोटमध्येच राहिली. तिने शारदामाता इंग्लिश मीडियम या शाळेतून शिक्षण घेतले. त्या दरम्यान तिने आपले नृत्यगुरू रघुराज गड्डम यांच्याकडून भरतनाट्यमचे धडे घेतले. त्यांनी सर्वप्रथम तिला तिच्यात असलेल्या अनोख्या कलेची ओळख करून दिली. ‘तुझ्यात नृत्याचे अंग आहे, तू यातच करिअर कर’, असे सांगितले. त्यानंतर प्युमोरीने चेन्नईत नृत्याचा डिप्लोमा केला. त्यानंतर पुढे दिल्लीत अनेक वर्षे विविध महोत्सव देश-विदेशातील भारत सरकारच्या शासकीय नृत्य महोत्सवाचे प्रतिनिधित्व केले.
 
देश- विदेशातील कोरिया सिंगापूर अमेरिका, इंग्लंड अशा देशात नृत्याचे सादरीकरण केले. दरम्यानच्या काळात एका जाहिरातीची संधी आली, तेव्हा त्यांनी मुंबई गाठली. त्यात ऑडिशन देऊन कामाची पावती मिळवली आणि ‘व्हील’ची पहिली जाहिरात त्यांनी २००० मध्ये केली. त्यानंतर अनेक जाहिराती, हिंदी मालिका केल्या आणि आता ती चित्रपटांकडे वळली आहे. 

सोलापूरची असल्याचा अभिमान 
कलेच्या क्षेत्रात मुंबई, दिल्ली, चेन्नईला राहावे लागले. मात्र सोलापुरात घर आहे. अजूनही त्या आठवणी आहेत. आमचे काही लोक तिथे राहतात. काही वर्षांनी काम असेना आम्ही येऊन जातो. सोलापूरच्या मातीनेच धाडसाचे आणि काम करण्याचे बळ दिले आहे. सोलापूरचा अभिमान वाटतो.
- प्युमोरी मेहता, अभिनेत्री 

यात काम केले आहे प्युमोरीने 
सावधान इंडिया क्राइम पेट्रोल, किट्टी पार्टी ग्रहस्ती, तेरे लिए, एम नई छोटीसी जिंदगी, इस प्यार को क्या नाम दू?, कितनी महोब्बत है, लुटेरी दुल्हन, उत्तरायणमध्ये दिव्या जागी ठाकूरची भूमिका साकारली होती. हॅलो प्रतिभा, तुम ऐसे ही रेहना, रिपोर्टस, तर सनम तेरी कसम आणि उर्बान लद्दार या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजणाऱ्या लघुपटातही तिने काम केले आहे.
बातम्या आणखी आहेत...