आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात सुरू झाली एअर अॅम्बुलन्सची सेवा, आतापर्यंत दोघांना मिळाली सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत, या हेतूने सोलापुरात एअर अॅम्बुलन्सची सेवा सुरू करण्यात आली. सोलापुरातील आकाश एअर अॅम्बुलन्सचे व्यवस्थापकीय संचालक नेताजी मोरे यांनी सेवा सुरू केली असून आतापर्यंत दोन रुग्णांना एअर अॅम्बुलन्सची सुविधा मिळवून दिली. ही सेवा गंभीर रुग्णांना सोलापुरातून इतर शहरात हलविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

सोलापुरातील एअर अॅम्बुलन्सची सेवा मुंबई, दिल्ली, औरंगाबाद, नागपूर, हैदराबाद आदी प्रमुख शहरांशी जोडली गेली आहे. एअर क्राफ्टसोबत चॉपरची देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तत्काळ वैद्यकीय उपचार मिळाले नसल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. रुग्णांना देशातील कोणत्याही शहरात तत्काळ वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी एअर अॅम्बुलन्सची सेवा खूप महत्त्वाची आणि जीवनदायी ठरते. सोलापुरातील आकाश एअर अॅम्बुलन्सचा सध्या तरी मुंबईतील मंदार बारबे या एअरलाइन्सशी करार झाला आहे.
स्पाईस जेट आणि इंडिगो या एअरलाइन्सशी देखील त्यांची बोलणी सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या कंपन्यांची विमाने सोलापूरसाठी उपलब्ध होण्यासाठी मदत होऊ शकते. एअर अॅम्बुलन्सचा प्रत्येक शहरांचा दर वेगळा असणार आहे.

सेवेचा आणखी विस्तार करणार
सोलापुरात एअरअॅम्बुलन्सची सेवा सुरू करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होतो. ती आता सुरू करण्यात आली आहे. याचा विस्तार करण्यासाठी लवकरच नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेणार आहे. नेताजी मोरे, व्यवस्थापकीयसंचालक , आकाश एअर अॅम्बुलन्स, सोलापूर