आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आंबेडकर जयंतीच्या सुटीत पाच शस्त्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
सोलापूर - सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शुक्रवारी शासकीय सुटी होती. ती घेता डॉक्टरांनी गुंतागुंतीच्या पाच मोठ्या शस्त्रक्रिया केल्या. डॉक्टरांनी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी करण्यावर भर दिला असून, रामनवमीलाही असे शिबिर घेतले होते. रुग्णांना जीवनदान देण्याचे काम केले जात आहे. अशी माहिती विभाग प्रमुख प्रा. डाॅ. सुनील हंद्राळमठ यांनी दिली. 
 
सिव्हिलमधील अॉर्थोपेडिक विभागात अतिरिक्त शस्त्रक्रिया करण्यासाठी सुटीच्या दिवशीही कॅम्पचे आयोजन केले जाते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ते दुपारी चारच्या दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये हातावरील दोन, मणका, खुबा पायाच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शासकीय सुटी असूनदेखील हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधील नर्सेस, कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 
 
शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी भेट दिली. विभाग प्रमुख डॉ. सुनील हंद्राळमठ, डॉ. पुष्पा अग्रवाल, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. औदुंबर मस्के, डॉ. शशिकांत जाधव, डॉ. गुरुनाथ वच्चे, डॉ. सौरभ अग्रवाल, डॉ. गोकुळ बंदगी, डॉ. निखिल गद्रे, डॉ. हिंमत घाटे, एस. व्ही. कुलकर्णी, एन. एफ. सगरी याचे याेगदान लाभले
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
 
बातम्या आणखी आहेत...