आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमेंटच्या जंगलात शोधू कुठे निवारा? वृक्ष तोडीमुळे पशुपक्ष्यांचा आधार संपत चालला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकीकडे निसर्गाची अवकृपा होत असल्यामुळे शेतीव्यवसाय धोक्यात आला आहे. दुसरीकडे निसर्गाचा फटका पशुपक्ष्यांनाही बसत आहे. जंगल बकाल झाल्यामुळे ही आपत्ती ओढवली आहे. वृक्ष तोडीमुळे पशुपक्ष्यांचा आधार संपत चालला आहे. त्यामुळे अलीकडे वन्य पशू शहरांमध्ये घुसल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. पक्ष्यांचीही स्थिती अशीच आहे. उस्मानाबाद शहरात सिमेंटच्या घरावर सुगरण पक्ष्यांचा थवा वास्तव्य करीत असल्याचे आरिफ शेख यांच्या कॅमेऱ्यात कैद झाले. पण, पक्ष्यांना सिमेंटच्या या जंगलात आधार कसा मिळेल, हा प्रश्न कायम आहे.