सोलापूर- विडी कारखाने बंद असल्याने गरजू महिला कामगारांना अन्न देण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘अन्न बँक’ योजना सुरू केली. सोमवारी सकाळी गेंट्याल चौकात त्याचे नोंदणी केंद्र सुरू झाले. महिलांची प्रचंड गर्दी झाली. परंतु निराधार, विधवा आणि परितक्त्या महिलांनाच त्याचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर चिडलेल्या महिलांनी ‘रास्ता रोको’ केला. त्याच वेळी पोलिस आले. त्यांच्याशी वाद झाला. ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम हेही तिथे गेले. त्यानंतर वाद तिथेच मिटला.
गेंट्याल चौकातील सर्व महिलांना घेऊन श्री. आडम शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री तथा कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांना भेटायला गेले. महिलांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या ठोकला. त्यानंतर आडम, देशमुख, सहायक कामगार आयुक्त यांची बैठक झाली. काही कारखानदारांना बोलावण्यात आले. श्री. आडम यांनी कामगारांची कैफियत मांडली. तातडीने कारखाने सुरू करा, दोन हजार रुपयांची अनामत अदा करा, महिनाभराचे अन्नधान्य द्या अशा मागण्या केल्या. कारखानदारांशी संपर्क करून श्री. देशमुख त्यांच्याशी बोलले.
विरोधकांना चांगले काम बघवत नाही
^सर्वगरजूमहिला विडी कामगारांना अन्न देण्याचे जाहीर केले. त्यानुसार सोमवारी सकाळी शांततेत नोंदणी सुरू होती. परंतु विरोधकांना हे चांगले काम पाहवले नाही. त्यांनी त्यात खो घालण्याचा प्रयत्न केला. आमच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी कुणाशी वाद घातला नाही. सर्व गरजू महिलांना धान्य देणारच. ज्यांचे पती कमवते नाहीत, त्या महिलांनाही अन्न देण्याची व्यवस्था करण्यात येईल. प्रणिती शिंदे, आमदार
महिलांनी केले उत्स्फूर्त आंदोलन
कामगारांचामूळप्रश्न बाजूला ठेवून त्यांना अन्न देण्याची घोषणा करताना नावनोंदणी करण्यासाठी गेल्यानंतर तिथे कार्यकर्ते महिलांच्या अंगावर येतात. हा काय प्रकार आहे? त्याच्या विरोधात महिला उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येऊन आंदोलन करत होत्या. पोलिसांशी वाद घालत होते. घटनास्थळी जाऊन सर्वांना शांत केले. मूळ प्रश्नाविषयी पालकमंत्र्यांकडे जाब विचारला.
नरसय्या आडम, ज्येष्ठकामगार नेते
कामगार नेते आडम यांनी शासकीय विश्रामगृहात ठिय्या आंदोलन केले. पालकमंत्री देशमुख यांनी महिलांना मार्गदर्शन केले.