आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंत्योदय याेजना: लाभार्थी कमी केल्याने गरीबांंना फटका, दरमहा मिळणारे धान्य झाले कमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- अंत्योदय योजनेचे लाभार्थी योजनेतून कमी करून त्यांना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आल्याने कुटुंबांना दरमहा मिळणारे धान्य कमी झाले असून त्याचा फटका गरीब, वंचित आणि आदिवासी कुटुंबांना बसला आहे. अन्न-पुरवठा विभागाने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 


अलिकडेच अन्न पुरवठा विभागाने परिपत्रक काढून अंत्योदय योजनेला कात्री लावण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या कुटुंबात एक वा दोन लोक आहेत, अशा सर्व कुटुंबाना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. एकास किलो दोन लोक असल्यास १० किलो अन्न देण्याच्या विभागाच्या निर्णयामुळे अनेक सर्व गरीबातले गरीब, वचिंत वयोवृद्ध, निराधार, अपंग, विधवा, आदिवासी कुटुंबांवर संकट निर्माण झाले असल्याचे मिशनने नमूद केले आहे. 


अन्न-पुरवठा विभागाचा निर्णय सरकारची लोककल्याणकारी प्रतिमा खराब करणारा असुन सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणारा आहे. त्यामुळे अन्नापासून वंचित ठेवणाऱ्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 


या बदलामुळे संबंधित कुटुंबांना आधी प्रति महिना मिळणारे ३५ किलो धान्य कमी झाले आहे. आता अन्न सुरक्षेच्या प्राधान्य यादीत यांना महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो धान्य दिले जाणार आहे. वास्तविक विदर्भात आदिवासी, आदिम जमाती मोठय़ा प्रमाणावर आहेत. याच भागात भुकेमुळे आणि रोजगार नसल्याने कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. या पाश्र्वभूमीवर तिवारी यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. 


अंत्योदय योजनेचे धान्य खुल्या बाजारात विकल्या जाऊ नये, असा अन्न-पुरवठा विभागाचा प्रयत्न असल्यास सरकारने अत्यंत गरीब, वचिंत वयोवृद्ध, निराधार, अपंग, विधवा ,आदिवासी कुटुंबांना २० किलो धान्य मोफत पुरविणाऱ्या अन्नपूर्णा योजनेत समाविष्ट करावे, असाही प्रस्ताव मिशनने सरकारला दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...