आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : काल्याने आषाढी उत्सव सोहळ्याची सांगता, गोपाळकाला गोड झाला...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - गोपाळकाला गोड झाला । गोपाळाने गोड केला ।। च्या जयघोषात अवघी  गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. आषाढीचा सोहळा म्हणजे वारकरी संप्रदायातील महाकुंभमेळा होय. परंपरेप्रमाणे काल्याच्या उत्सवाने या सोहळ्याची   रविवारी सांगता झाली. गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी सर्व पालख्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.     
 
आषाढी एकादशीचा अनुपम्य सोहळा पार पडल्यानंतर भाविकांना वेध लागतात ते पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे होणाऱ्या गोपाळकाल्याचे. त्यानुसार आज (िद. ९) पौर्णिमेच्या दिवशी पहाटे पाच वाजता परंपरे प्रमाणे मानाची अंमळनेरकर महाराजांची पालखी काल्याच्या उत्सवासाठी गोपाळपूर येथील भगवान श्री कृष्ण मंदिरात दाखल झाली. त्या नंतर मंदिरामध्ये काल्याचे कीर्तन झाले.    
 
पुढे पुढे चाला । मुखाने श्री गजानन बोला ।। चा जयघोष करीत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे  पहाटे शिस्तीने आगमन झाले.    
दरम्यान पहाटेपासूनच विविध संतांच्या छोट्या- मोठ्या दिंड्या व पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल होत होत्या. सकाळी श्री संत तुकाराम महाराजांची आणि त्यानंतर काही वेळाने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पालख्यांचे स्वागत केले.   
 
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.  शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत मंदिराच्याजवळ बांधण्यात आलेल्या पालखी तळावर पालख्या विसावल्या होत्या.    
 
समितीच्या सत्कारावर वारकऱ्यांचा बहिष्कार    
गोपाळपूर येथील काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर येथील श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी मानाचे सात संतांचे पालखी सोहळे दाखल झाले. या वेळी परंपरेप्रमाणे संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये नेऊन तेथे भेटीचा उत्सव देखील संपन्न झाला. मात्र मंदिर समिती बरखास्त करावी या मागणीसाठी वारकरी संप्रदायामधील महाराज मंडळींनी ठरवल्याप्रमाणे विविध संतांच्या पालखी सोहळा प्रमुखांनी मंदिर समितीच्या सत्कारावर आज बहिष्कार टाकला. 
बातम्या आणखी आहेत...