आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : पंढरीत दहीहंडी फोडून महाद्वार काल्याचा उत्सव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंठी धरीला कृष्णमणी, 
अवघा जनी प्रकाश ।   
काला वाटू एकमेका, 
वैष्णव निका संभ्रम ।   
तुका म्हणे भूमंडळी, 
आम्ही बळी वीरगाडे ।।  
  
येथील हरिदास मंडळींनी हा परंपरागत अभंग म्हणत दहीहंडी फोडून महाद्वार काल्याचा उत्सव शेकडो भाविकांनी ‘याचि देही याचि डोळा’ आज अनुभवला. त्रैता युगात श्रीरामाने आपले बंधू भरत याला, द्वापार युगात श्रीकृष्णाने उद्धवाला, तर कलियुगात हरिदास घराण्यातील पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष श्री पांडुरंगाने पादुका दिल्या. तेव्हापासून आजतागायत पंढरीनगरीमध्ये या आनंद सोहळ्याचा उत्सव महाद्वार काल्याच्या रूपाने साजरा करण्याची परंपरा आहे.     

दरवर्षीप्रमाणे महाद्वार काल्याचा उत्सव पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येत असतो. त्याप्रमाणे सोमवारी हा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये शेकडो वारकरी भाविकांबरोबरच शहरातील नागरिकदेखील सहभागी झालेले दिसत होते. त्यांना श्री विठ्ठलाने आषाढी व कार्तिकी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी या पादुका डोक्यावर ठेवून काला करण्याची आज्ञा दिल्याची अाख्यायिका आजही सांगितली जाते. त्यानुसार गोपाळपूरचा काला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाद्वार काल्याची परंपरा आजतागायत अखंडपणे सुरू आहे. येथील हरिदास घराण्यातील मदन महाराज हरिदास यांना या पिढीत काल्याची सेवा बजावण्याचा मान आहे.    
दरम्यान, आज दुपारी बारा वाजता येथील हरिदास यांच्या काल्याच्या वाड्यात मदन महाराज हरिदास यांच्या डोक्याला पागोटे बांधण्यात आले. त्यानंतर साक्षात विठुरायाने दिलेल्या पादुका त्यांच्या डोक्यावर ठेवण्यात आल्या. हा मान संत नामदेव महाराजांच्या वंशजांना आहे. तेथून हा सर्व मेळा नामदेव पायरीचे दर्शन घेऊन श्री विठ्ठल मंदिरात पोहोचला.    

श्री विठ्ठल मंदिरातील सभामंडपात मदन महाराज हरिदास यांना भाविकांनी खांद्यावर घेऊन पाच प्रदक्षिणा घातल्या.
बातम्या आणखी आहेत...