आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारचालकावर प्राणघातक हल्ला; दोघे निर्दोष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
सोलापूर-  भांडण सोडवण्यास गेल्यानंतर कारचालक अरविंद जाधव (रा. बोरामणी) याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात अाली. निसारखान सय्यदखान पठाण (वय ३५), मोहसीन अब्दुल रजाक कामतीकर या दोघांची निर्दोष मुक्तता अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी केली. 
 
२१ मार्च २०११ रोजी जोडभावी पेठेतील गणपती मंदिराजवळ भांडण सुरू होते. जाधव हे भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर दोघांनी मिळून त्यांनाच माराहाण केली होती. ते अामदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कारवर चालक म्हणून काम करतात. जोडभावी पोलिसात गुन्हा दाखल होता. पण, तो न्यायालयात सिद्ध झाला नाही. सरकारतर्फे पी. एम. रजपूत तर अारोपीकडून रियाज शेख या वकिलांनी काम पाहिले. 

म्हाडाक्रेन दुर्घटना, दोघे निर्दोष 
सोलापूर मोदीजवजळीलम्हाडा संकुलाचे बांधकाम सुरू असताना क्रेन कोसळून दोघेजण जखमी झाले होते. तीन घरांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी क्रेन चालक व्यवस्थापक या दोघांची निर्दोष मुक्तता न्यायदंडाधिकारी पंकज बिदादा यांनी केली. महादेव निवृत्त कदम (वय ४८, रा. चिंचवड, पुणे), गोकुळदास हाजगुडे (रा. देवळाली, भूम, उस्मानाबाद) यांची निर्दोष मुक्तता झाली. दोघांवर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. सप्टेंबर २०१५ रोजी बांधकाम साइटवर काम सुरू असताना क्रेन खाली कोसळले. हे बांधकाम बी. जी. शिर्के या कंपनीकडून सुरू होते. अपघातात शेख, लवटे, गायकवाड, पडनूर यांच्या घरावर क्रेन पडल्यामुळे नुकसान झाले होते. अंबुबाई अलमेलकर, विष्णू शिंदे हे दोघे जखमी होते. क्रेन चालवताना हजगुडे कदम यांनी काळजी घेतली नाही म्हणून पोलिसात तक्रार देण्यात अाली होती. हा गुन्हा सिद्ध झाला नाही. सरकारतर्फे संतोष पाटील, अारोपीतर्फे प्रशांत नवगिरे या वकिलांनी काम पाहिले. 
बातम्या आणखी आहेत...