आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाबासाहेब अकरावेळा सोलापुरात आल्याचा ऋणानुबंध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वंचितांचे मुक्तिदाते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई, नाशिक, नागपूरसह सोलापुरात येत होते. ते ११ वेळा आले. जिल्ह्यात परिषदा दौरे होत असत. त्यामुळे त्यांचा सतत संपर्क हाेता. येथे अनेक क्रांतिकारक घटना घडल्या. मे १९२४ साली ते प्रथम तर १४ जानेवारी १९४६ रोजी शेवटीे आले होते. दरम्यानच्या काळात २६ आणि २७ नोव्हेंबर १९२७ मध्ये जिल्हा वतनदार महार परिषदेचे दुसरे अधिवेशन सोलापुरात पंचाची चावडी (थोरला महारवाडा) येथे डाॅ. बाबासाहेबांच्या उपस्थितीत झाले. भीमसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने त्यांचा सोलापूरशी असलेला ऋणानुबंध....
मे १९२४ मध्येबार्शीत त्यांनी देशांतर, नामांतर की धर्मांतर यावर मार्गदर्शन केले. जानेवारी १९२५ मध्ये दुसऱ्यांदा आले. त्यावेळी मुलांचे पहिले वसतिगृह त्यांनी स्थापन केले. जीवप्पा एेदाळे हे पर्यवेक्षक होते. तेथे काही दिवस राहिले आणि तेथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. २६ २७ नोव्हेंबर १९२७ मध्ये वतनदार महार परिषदेचे दुसरे अधिवेशन सोलापुरात झाले. मुंबई कौन्सिल महार वतनदार सुधारणा करण्यासाठी जे बिल आणले त्यासह आठ ठराव करून पाठिंबा देण्यात आला. त्यावेळी बाबासाहेब सभामंडपात हजर होते. मार्च १९३२ मध्ये सोलापूरच्या रेल्वे स्टेशन येथे स्पृश्य अस्पृश्य मंडळींनी त्यांची भेट घेतली. २२ मे १९३२ मध्ये सोलापूरच्या वतीने त्यांना मानपत्र बॅच मॅजिस्ट्रेट पापय्या बेलपवार यांच्या अध्यक्षतेखाली देऊन सन्मानित करण्यात आले.

२४ जानेवारी १९३७ रोजी सहा वेळा डाॅ. बाबासाहेब सोलापुरात आले. त्यावेळी स्वतंत्र मजूर पक्षाच्या दौऱ्यांचा कार्यक्रम आखला. पहाटे तीन वाजता ते आले. त्यांचे स्वागत मानवी साखळी करून करण्यात आले. जीवप्पा ऐदाळे यांच्या प्रचारासाठी त्यांनी मंद्रूप, वळसंग, कुंभारी, बार्शी, कुर्डुवाडी, टेंभुर्णी, करमाळा भागात दौरा केला. ३१ डिसेंबर १९३७ मध्ये करकंब आणि पंढरपूरला आले होते. या वेळी नाशिकचे आमदार भाऊराव गायकवाड, कमलाकर चित्रे, साताऱ्याचे आमदार खंडेराव सावंत आदी हजर होते. जानेवारी १९३८ मध्ये बाबासाहेबांनी सोलापुरात हिंदी ख्रिस्ती समाजापुढे भाषण केले. जानेवारी १९३८ रोजी सोलापूर नगरपालिकेच्या वतीने भागवत चित्र मंदिर येथे डाॅ. बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले. नगरपालिकेचे अध्यक्ष राव बहाद्दूर डाॅ. व्ही. व्ही. मुळे यांनी मानपत्राचे वाचन केले. त्यावेळी बाबासाहेबांनी संसदीय लोकशाहीचे कार्य या विषयावर मत व्यक्त केले होते.

२३ फेब्रुवारी १९४१ मध्ये तडवळे येथे वतनदार महार, मांग परिषद डाॅ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जगण्यासाठी राजकीय हक्काची सत्ता आपल्या हाती हवी आहे, असे ते त्यावेळी म्हणाले होते. १४ जानेवारी १९४६ रोजी नगरपालिका जिल्हा लोकल बोर्डच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या कै. रा. ब. मुळे स्मारक मंदिरात त्यांना मानपत्र देण्यात आले. सार्वजनिक कार्याचा मुहूर्त मी साेलापुरात राेवला, असे वक्तव्य बाबासाहेबांनी मानपत्राला उत्तर देताना केले.
बातम्या आणखी आहेत...