आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्व बँकांचे सर्व ‘एटीएम’ सुरू करा, यंत्रणेतील बदल तातडीने करून घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नागरिकांना कमी वेळेत पैसे मिळण्यासाठी बँकांबरोबरच एटीएम सेवाही तातडीने सुरू करा. नव्या नोटांचे वितरण करता यावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांनी एटीएममध्ये आवश्यक सुधारणा करून घ्याव्यात, अशा सूचना केंद्र सरकारच्या निरीक्षक विजयालक्ष्मी बिदरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत दिल्या.
बैठकीस जिल्हाधिकारी रणजित कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, संजय तेली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, मुद्रांक जिल्हाधिकारी एस. एन. दुतोंडे, उपजिल्हाधिकारी संजीव जाधव, मनपाचे लेखाधिकारी दत्तात्रय लोंढे, पोस्टाचे वरिष्ठ अधीक्षक बी. आर. नानजगी, अग्रणी बँकेचे प्रभारी व्यवस्थापक सुरेश श्रीराम आदी उपस्थित होते.

बिदरीयांच्या सूचना
नव्यानोटांसाठी एटीएममध्ये सुधारणा करण्यासाठी किमान सात दिवस लागतात. जिल्ह्यातील काही बँकांनी अशी प्रक्रिया केली आहे. उरलेल्यांनी ती प्रक्रिया गतीने करावी. नोटा बदलून घेणाऱ्याच्या हातावर मार्करने खूण करा. शहर, जिल्ह्यातील बँकांतून पैसे काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग यांची मोठी गर्दी आहे. त्यांच्यासाठी पैसे जमा करण्याची स्वतंत्र व्यवस्था करा. त्यांना पाणी, बसण्यासाठी आसन व्यवस्था करा, अशा सूचना श्रीमती बिदरी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हा बँकेत नाहीत पैसे
जिल्हा बँकेच्या बाळीवेस शाखेत बिदरी यांनी पाहणी केली. पैसे मिळाल्याने नागरिकांनी बँकेकडे स्लीपा ठेवून घरी गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पैसे किती मिळतात, किती वाटप होतात याची त्यांनी माहिती घेतली. पोस्ट कार्यालय, एचडीएफसी बँकेची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.

हजार १७२ कोटी जमा
२२ नोव्हेंबरपर्यंत सर्व बँकांच्या ५३६ शाखांमधून हजार १७२ कोटी जमा झाले. सर्वाधिक ५७६ कोटी १० लाख भारतीय स्टेट बँकेकडे जमा झाले. प्रमुख बँकांत बँक ऑफ इंडियाकडे ५०७ कोटी ६४ लाख, बँक ऑफ बडोदाकडे ४७८ कोटी २४ लाख, आयसीआयसीआयकडे ३२८ कोटी ६४ लाख, जिल्हा बँकेकडे २४० कोटी जमा झाले.

महसूल कमी, कर वसुली वाढली
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ४७३९ दस्तांची नोंद झाली होती. त्यातून ११ कोटींचा महसूल मिळाला होता. यंदा आतापर्यंत १४३५ दस्तांची नोंद झाली असून कोटी ३७ लाख रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती श्री. दुतोंडे यांनी दिली. मनपा कर वसुलीत ३२ टक्के वाढ झाली. एकूण २२ कोटी रुपये जमा झाले. जिल्हा बँकेकडे जमा झालेली रक्कम कोषागार शाखा स्वीकारत नाही, शिवाय शेतकऱ्यांनाही पुरेशी रक्कम मिळाली नसल्याचे जिल्हा बँकेचे व्यवस्थापक मोटे यांनी सांगितले.

बिदरी यांच्याकडे मागण्या
शेतकऱ्यांना औषधे खते खरेदी करण्यासाठी जुन्या नोटा वापरण्याची मुभा मिळावी. यावर ही बाब केंद्र सरकारकडे सुचविण्यात येईल, असे बिदरी यांनी सांगितले. नोटांच्या बंदीनंतर शेतमालाचे भाव घसरले आहेत, अशी माहिती श्री. बिराजदार यांनी दिली. जिल्ह्यातून डाळिंब, कांदा, द्राक्षे यांची उलाढाल मोठी आहे. निर्यातीला सवलत किंवा अनुदान मिळण्याची विनंती उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केली. जुन्या नोटांद्वारे कर स्वीकारण्यास मुदतवाढ मिळावी, असे श्री. लोंढे यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना वेतनातील ५० टक्के रक्कम दहा हजार रुपयांच्या मर्यादेत रोखीने द्यावीे. याचे पत्र शासनाला पाठवले जाणार आहे, असे जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...