आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काही पेटीएमने, काही स्वाइप मशीनने, मात्र बहुतांश व्यवहार रोखीनेच सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नोटा रद्दच्या निर्णयानंतर मागील दोन आठवडे काम केल्यानंतर शनिवार रविवार असे दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. यामुळे एटीएम यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. सोमवारी नियमितपणे बँका सुरू होतील, पण अनेक बँकांकडे नागरिकांना देण्यासाठी पैसे नसल्याने व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे तर काही बँकांच्या शाखा बंद ठेवाव्या लागणार असल्याचे सू़त्रांकडून सांगण्यात आले. सोमवारी रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळाले तर इतर सहकारी खासगी बँकांना पैसे उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील बँकांना रिझर्व्ह बँकेकडून पैसे कधी मिळणार ? यावर बँक अधिकाऱ्यांनी सांगता येत नाही, असे सांगितले. स्टेट बँकेकडे फक्त दोन दिवस पुरतील इतकेच चलन उपलब्ध आहे तर बँक ऑफ इंडियाकडे फक्त दोन हजारच्या नोटा असल्याचे सांगण्यात आले. रिझर्व्ह बँकेने पैसे मिळण्याबाबत कोणतीही शक्यता व्यक्त केली नाही. यामुळे बँकेच्या व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कंटेनररिकामे परतले
जिल्ह्यातील बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे पैसे आणण्यासाठी पाठविण्यात आलेले कंटेनर रिकामे सोलापूरला परतले आहेत. रिझर्व्ह बँकेकडून पैसे पाठवून देण्याची व्यवस्था करणार असल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे आता सोमवारी बँका सुरू झाल्यानंतरच बँकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येणार आहे.

सुट्यापैशांची चिंता सर्वसामान्य ग्राहकांना सतावत असल्याने १०० रुपयांच्यावरील व्यवहारावर याचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून आला आहे. अत्यावश्यकच खरेदीवर ग्राहकांचा भर असलेला दिसून येतो आहे. हॉटेल, करमणूक, अतिरिक्त शॉपिंग यावर खर्च आटोपशीर करण्यात येत आहे.

जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, दैनंदिन किरकोळ व्यवहार, मंडई यातील व्यवहारांवरही पन्नास टक्के परिणाम झाला आहे. काही दुकानदारांनी पेटीएम सारखी सुविधा लागू केली आहे. मोठे दुकानदार स्वाइप मशीनचा पर्याय स्वीकारत आहेत. पण किराणा दुकानदारांना मात्र असा पर्याय व्यावहारिक वाटत नाही. या दुकानांना सुट्या रकमेचा चांगलाच सामना करावा लागत आहे. सुटे नोटा देणा ऱ्या ग्राहकांनाच खरेदीसाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे चित्र किरकोळ व्यवहारातही दिसून येते आहे.

मेकॅनिकल चौकातील कैलास किराणा स्टोअरचे मालक शाम चंचलानी म्हणाले, ‘सुट्टे नोटा ग्राहकांनी आणल्या तर खरेदी विक्री व्यवहार होत आहे. ५० टक्के व्यापार मंदावला आहे. पेटीएम, स्वाइप मशीनबाबत अजून कोणताही विचार केला नाही.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क चौकातील अनमोल मिठाईचे संचालक विक्रम वधारिया म्हणाले, ‘पेटीएम सारखी सुविधा स्वीकारली आहे. रोख व्यवहारही होतो. नोटाबंदीचा ५० टक्के परिणाम जाणवतोय. पण काही काळात व्यवहार सुरळीत होतील.’

चार पुतळा परिसरातील युनियन बुक स्टॉलचे मालक प्रवीण जोशी म्हणाले, पुस्तक विक्रीत सध्या तशीही मंदीच आहे. पुढील महिन्यापासून व्यवहार वाढ होईल. सध्या नोट बंदीमुळे इतर व्यवहारही संथ होत आहेत.

दोन दिवस पुरेल इतके चलन
^रिझर्व्हबँकेकडून नवीन नोटा मिळण्याबाबत अद्याप कोणताही आदेश मिळाला नाही. दोन दिवस पुरतील इतके चलन बँकांकडे आहे. त्यानंतर व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.” सुहासगंडी, मुख्य व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया
बातम्या आणखी आहेत...