आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राहकांसह बँकांनाही ‘चलनचकवा’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कितीही पैसे भरा आणि कितीही काढा, असा नवा आदेश रिझर्व्ह बँकेने मंगळवारपासून लागू केला असला तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलटी दिसून येत आहे. मंगळवारी शहर जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक वगळता इतर बँकांमध्ये रोकड नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले तर पैशांची अधिक निकड असलेल्या नागरिकांना बँक अधिकाऱ्यांवर त्रागा करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. बुधवारीही बँकांकडे पैसे आल्यास बँका बंद ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचे राष्ट्रीयकृत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
रिझर्व्ह बँकेने सोलापूर जिल्ह्यातील बँकांना पैसे उपलब्ध करून १२ दिवस उलटले. त्यानंतर अद्याप पैसेच उपलब्ध केले नाहीत. शुक्रवारपासून (दि. २५) बँकांना चलन तुटवडा जाणवू लागला. शनिवार रविवार दोन दिवस एटीएममधीलही रक्कम संपली. बँकांकडे जी रक्कम होती ती सोमवार मंगळवार या दोन दिवसात वाटप करण्यात आली. बुधवारी रिझर्व्ह बँकेकडून रक्कम येईल, या आशेवर बँकांनी दोन दिवस काढले. मात्र बुधवारीही नवीन चलन मिळणे, अशक्य असल्याचे चित्र आहे.

याबाबत बँक ऑफ इंडियाचे श्री. नेर्लेकर यांनी १५५ कोटी रुपयांची रिझर्व्ह बँकेकडे मागणी केली आहे. रोकड आणण्यासाठी बँकेचे अधिकारीही मुंबईलाच गेले आहेत. अद्याप रिझर्व्ह बँकेकडून रोकड कधी उपलब्ध होईल, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाने ३०० कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी अनेक शाखांकडे पैसे नसल्याने बुधवारी काही शाखा बंद ठेवाव्या लागणार आहेत. यामुळे रिझर्व्ह बँकेकडून नवीन चलन उपलब्ध झाल्यानंतरच बँकेचे व्यवहार सुरळीत होणार अाहेत.

^शिवाजी चौकातीलयुनियन बँकेत मंगळवारी पैसे काढण्यासाठी गेलो. पैसे काढण्यासाठी मोठी रांग होती. काही नागरिकांना मागणीपेक्षा कमी रक्कम देऊन कॅशियरने पैसे संपल्याचे सांगितल्याने नागरिकांनी बँक अधिकाऱ्यांना जाब विचारला. पैसे संपल्याने सर्वच नागरिक परतले. व्यवस्थापकांनी रोकड मिळताच पुन्हा वाटप करणार असल्याचे सांगितले.'' संदीपशितोळे, नागरिक.

^अशोक चौकातीलबँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होतो. मात्र कॅशियरने पैसे संपल्याचे सांगितले. पैसे कधी उपलब्ध होतील, यावर कॅशियरने आम्हालाच माहिती नसल्याचे उत्तर दिले.'' डी.एन. घोडके, नागरिक.

^रिझर्व्ह बँकेकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. यावेळीच आरबीआयकडून कधी आणि किती पैसे उपलब्ध होतील, याची माहिती मिळेल.'' सुरेश श्रीराम, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.
बातम्या आणखी आहेत...