आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा : साेलापूरसह 75 रेल्वे स्टेशनवर बॅटरीने चालणार कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाेपाळ- प्रवाशांच्या सुविधेसाठी देशातील ए-1 श्रेेणीच्या 75 रेल्वे स्टेशनवर बॅटरीवर चालणाऱ्या कार उपलब्ध करून दिल्या जाणार अाहेत. विशेषत: महिला, वृद्ध, दुर्बल अाणि गरजू प्रवाशांना एका प्लॅटफाॅर्मवरून दुसरीकडे जाताना जाे त्रास हाेताे ताे टाळण्यासाठी या कार उपयुक्त ठरणार अाहेत. याशिवाय साेबतचे लगेज देखील रेल्वे डब्यापर्यंत पाेहाेचवले जाणार अाहे. रेल्वे मंत्रालयाचे संचालक (ट्रॅफिक-कमर्शियल) विक्रम सिंह यांनी ही माहिती दिली.

प्रवाशांना या सेवेसाठी अल्प स्वरूपाचे शुल्क द्यावे लागणार असून अशा स्वरूपाच्या कारची घाेषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली हाेती. येत्या अाॅगस्ट अखेरीस भाेपाळ, चंदिगड, रायपूरसह अन्य रेल्वे स्थानकांवर कार चालवल्या जाणार अाहेत. या कार व्यस्थेसाठी रेल्वे विभागातर्फे काहीही खर्च केेला जात नाही खासगी फर्मच्या माध्यमातून ही सेवा प्रवाशांना पुरवली जाणार अाहे. यासाठी टेंडर प्रक्रिया पुढील अाठवड्यात सुरू केली जात अाहे.
चार्जिंग पाॅइंट रेल्वे देणार
ही कार चालवण्यासाठी बॅटरी चार्ज करावी लागणार असून त्यासाठी रेल्वे तर्फे विविध फलाटांवर तसेच डेप्युटी कमर्शियल मॅनेजरच्या अाॅफिसमध्ये चार्जिंग पाॅइंट बसवला जाणार अाहे. या कारचे मेंटेनन्स, सुरक्षेची जबाबदारी संबंधित खासगी संस्थेची असेल.
साेलापूर आणि मुंबईत साेय
ही सुविधा साेलापूर, मुंबर्इ, नागपूर प्रमाणेच अमृतसर, चंदिगड, लुधियाना, अंबाला, जबलपूर, भाेपाळ, हरिद्वार, वाराणसी, बिलासपूर, रायपूर, अजमेर, जाेधपूर, जयपूर, वडाेदरा, राजकाेट, सूरत, अहमदाबाद, छपरा, मुजफ्फरपूर, भागलपूर, पाटणा, धनबाद या रेल्वे स्थानकांवर पहिल्या टप्प्यात पुरवली जाणार अाहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, ऑनलाइन नोंदणीबाबत..
बातम्या आणखी आहेत...