आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोगावतीच्या सौंदर्यीकरणासाठी शहरवासीयांची झाली एकजूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकाऱ्यांसह शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांनी भोगावतीची पाहणी केली. - Divya Marathi
जिल्हाधिकाऱ्यांसह शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांनी भोगावतीची पाहणी केली.
उस्मानाबाद- शहरातूनवाहणाऱ्या भोगावती नदीच्या सौंदर्यीकरणाची सुरुवात आता लोकसहभागातून होणार आहे. शहरातील विविध राजकीय पक्षाच्या, विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक पार पडली असून, नदीची भ्ूजल पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या धर्तीवर कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. शिवाय दोन्ही बाजूंनी झाडी लावण्यात येणार आहे.

शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीचे अस्तित्व हळहळू संपुष्टात येत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब धोकादायक असल्याने नागरिकांनी नदीचे संवर्धन करण्याची गरज आहे. नदीचे खोलीकरण, सरळीकरण तसेच शुध्दीकरण करून पाणी अडविण्याची संकल्पना शहरातील विविध संघटना, राजकीय पक्षाच्या नेत्यांना सुचली आहे. त्याला जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी मार्गदर्शन केले. भोगावती नदीचे जतन करण्यासाठी शहरवासीय एकत्र आल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय शिंगाडे यांनी केले. भालचंद्र कोकाटे यांनी सूत्रसंचलन, आभार प्रकाश जगताप यांनी मानले. बैठकीसाठी प्रभारी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मुख्याधिकारी राजेश जाधव, जयंत पाटील, अॅड.रामभाऊ गरड, नितीन तावडे, अनिल मंजुळे, अॅड. मििलंद पाटील, भारत काेकाटे, डॉ.अभय शहापूरकर, अमित शिंदे, रोहित निंबाळकर, डॉ. चंद्रजित जाधव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्य मराठीने अभियान चालविल्यानंतर पालिकेने नदीच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला. हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर मंत्रालयातील नगर विकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. नदीची गटारगंगा होत असल्याचे “दिव्य मराठी’ने उजेडात आणल्यानंतर प्रशासनाने दोन किलोमीटरपर्यंत पात्र स्वच्छ केले होते. झुडपे तोडून नदीपात्रातील शेकडो टन गाळ उपसून काढण्यात आला होता. त्यामुळे पात्र वाहते झाले होते.

लोकवाट्यातून सुधारणा
भोगावतीच्याविकासासाठी शहरातील नागरिकांसह राष्ट्रीयीकृत बँका, आमदर, खासदार निधी, पालिकेचा निधी जमा करून खर्च करण्यात येईल काय, याबाबतचा विचार मांडण्यात आला.

कशामुळे नदीला धोका?
भोगावतीनदीच्या संवर्धनासाठी "दिव्य मराठी’ने अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच प्रशासनाने गेल्यावर्षी नदीची प्रथमच मोठ्या प्रमाणावर स्वच्छता झाली होती. नदीमध्ये पुन्हा घाण झाली असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी नदीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नदीचे पावित्र्य जपा, पात्रामध्ये कचरा टाकू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना दोन वर्षांपूर्वी केले होते. मात्र, या भागात कचरा टाकला जात असल्याने नदीचे पात्र धोक्यात येत आहे.
काय आहे आराखड्यात?
नदीच्यासुशोभीकरणासाठी कोटी ५८ लाख रुपयांच्या तयार करण्यात आलेल्या आराखड्यात नदीच्या दुतर्फा लोखंडी रिलिंग, पथदिवे, आकर्षक झाडी, पदपथ, स्वच्छतागृहाचा समावेश असून, विरंगुळ्यासाठी खेळणी, खाद्यपर्थाचे स्टॉल्स असणार आहेत. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला तरी नदीचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

बैठकीचा फार्स ठरू नये
शहराच्यासौंदर्यामध्ये भर घालणाऱ्या भोगावतीचे सौंदर्य खुलवण्यासाठी सर्वपक्षीय, सर्व संघटनेचे नेते प्रथमच एकत्र आले असले तरी ही एकजूट किती दिवस टिकणार, हा खरा प्रश्न आहे. सार्वजनिक कामासाठी लोकसहभाग आवश्यक असला तरी शहरातील विकासकामासाठी तो मिळालेला नाही. या प्रयत्नातून नवीन पायंडा पडेल. अन्यथा अशा बैठका निव्वळ फार्स ठरतील.