आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुळाच्या पिशवीत कोळसा, आता यांना भाजप नेते म्हणून ओळखा! राजेंद्र राऊत, कापसेंना भाजपच्या पायघड्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हाबँकेची मालतारण कर्जात फसवणूक करणाऱ्या बार्शी तालुक्यातील अरुण कापसे यांनी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे रविवारी जाहीर केले. राऊत यांनी जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराविरोधात याचिका दाखल केली आहे. त्याच राऊतांनी कापसे यांना पवित्र करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने भाजपवासी झालेले राजेंद्र राऊतही गोळीबार प्रकरणात आरोपी आहेत. या दोघांना पक्षात प्रवेश देऊन भाजप ‘पार्टी विथ डिफरन्स’चे बिरूद मिरवत आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांना सोबत घेऊन महाअाघाडी करीत आहे. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले. राऊतांनी नगरपालिका निवडणुकीत मोठे यश मिळवले होते. जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपा नेत्यांनी बार्शीच्या ग्रामीण राजकारणावर पकड असलेल्या राऊतांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस असलेल्या अरुण कापसेंसाठी भाजपा नेते “रेड कार्पेट’ टाकत आहेत. जिल्हा परिषद, महापालिकेतील सत्तेचा मेळ घालण्यासाठी भाजपाचे नेते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील गुन्हेगार,घोटाळेबाज लोकांना पक्षात प्रवेश देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यासाठी बैठकाही होत आहेत. प्रचार सभांमध्ये भ्रष्टाचाराला थारा देत नसल्याच्या गप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपचे राज्यातील नेतेही मारतात. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. 

राजेंद्रराऊतांवरील : गोळीबार प्रकरणातील आरोपी 
राजेंद्र राऊतांवर मारहाण, दमदाटीचे गुन्हे दाखल आहेत. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत देवगाव (ता.बार्शी) येथे गाेळीबाराचे प्रकरण घडले होते. याप्रकरणी राजेंद्र राऊत यांच्यासह आठजणांवर खटला दाखल आहे. बार्शीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गेली अनेक वर्षे हा खटला प्रलंबित आहे. विशेष म्हणजे याच राऊतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “सहकार्य’ करणार असल्याचे वृत्त आहे. 

एक बँकेसाठी भांडतो, दुसरा गंडवतो, आता दोघे एकत्र? 
राजेंद्रराऊत जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराच्याविरोधात बोलतात. पण नव्याने खेळ मांडणीत राऊतांनी भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्यांशी दोस्ती केली. कापसेंनाही जवळ केले आहे. भाजप महाअाघाडीसाठी प्रयत्न करणारे जिल्हा बँकेच्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात प्रचार करीत आहेत. आता ही मंडळी कापसेंची तरफदारी कशी करणार याकडे लक्ष आहे. 
 
कोण अरुण कापसे? : पवार 
अरुणकापसे यांच्या प्रवेशाबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना “दिव्य मराठी’ने प्रश्न विचारले. 
-जिल्हाबँकेची फसवणूक करणाऱ्या बार्शीच्या अरुण कापसे यांना आपण भाजपामध्ये प्रवेश देताय? Áकोण अरुणकापसे, मी ओळखत नाही. मला तुमच्याकडूनच माहिती मिळत आहे. 
- आले तर प्रवेश देणार का? Áअहो, कायप्रस्ताव नाही. तुमच्याकडूनच माहिती मिळते आहे. मला काहीही माहिती नाही.
 
पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सोडलेही 
जिल्हाबँकेने अरुण कापसे यांच्या आदित्यराज शुगर्स कारखान्याला उभारणीसाठी आणि मालतारण कर्ज दिले. २०१६ मध्ये जिल्हा बँकेला आदित्यराज शुगर्सच्या गोदामात गूळ पावडरच्या पोत्याऐवजी भुस्सा आणि कोळसा आढळला. याप्रकरणी कापसे यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कापसे यांनी जिल्हा बँकेला प्रत्येकी कोटी रुपयांचे चार धनादेश दिले. यातील दुसरा धनादेश वटला नाही. त्यामुळे जिल्हा बँकेने पुन्हा नोटीस काढली. कापसे काही दिवस गायब होते. एक महिन्यापूर्वी नागपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. कापसे यांनी न्यायालयात पुन्हा चार टप्प्यात पैसे देईन,असे सांगितले अाहे. आता हेच कापसे भाजपाचे नेते म्हणून ओळखले जातील. 
बातम्या आणखी आहेत...