आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: भाजप, सेनेकडून आनंद; काँग्रेसने स्वीकारला पराभव, आर्थिक ताकद कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्थिक ताकद कमी
- पक्षाचे उमेदवार निवडून आले नाहीत. तरी काम करीत राहणार आहे. वस्तुस्थिती मान्य करावी लागते. प्रचारासाठी ताकद लावली होती. परंतु आर्थिक बाजू कमकुवत होती. त्यामुळे पराजयाला सामोरे जावे लागले. गतवर्षी एक उमेदवार निवडून आला होता.
” राजासरवदे, राज्याध्यक्ष, रिपाइं 

कामाची पावती 
- बहुजन समाज पार्टीच्या विचारसणीवर चार उमेदवार निवडून आले आहेत. आनंद चंदनशिवे यांनी केलेल्या कामाची पावती आहे. इतर ठिकाणी उमेदवार नवखे होते. तेथे प्रचारतंत्र कमी पडले. यंदा मतांची संख्या वाढली असून, उमेदवारांची संख्याही वाढली आहे.
” अॅड.संजीव सदाफुले, प्रदेश महासचिव, बसप 

जनतेचा कौल मान्य 
- मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. या वेळी आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. पण, मतदारांनी का नाकारले? याचे आत्मचिंतन करू. सभागृहात विरोधकाची भूमिका आम्ही पार पाडू. काँग्रेसने आणखी चांगले काम करावे, अशी मतदारांची अपेक्षा आहे. ती आम्ही निश्चित पूर्ण करू.
” सुधीरखरटमल, शहराध्यक्ष, काँग्रेस 

प्रभागाचा विकास करून दाखवू 
- मुस्लिमांसह सर्वच समाजबांधवांनी एमआयएमला पसंती दिली आणि शहराच्या विविध भागातून नऊ उमेदवार निवडून आले. काहींचा निसटता पराभव झाला. अन्यथा यशस्वी उमेदवारांची संख्या वाढली असती. प्रशासनाकडून काम कसे करून घ्यायचे आणि प्रभागाचा विकास कसा करायचा हे एमआयएमचे उमेदवार दाखवून देतील.
” कोमारोसय्यद, सरचिटणीस, एमआयएम 

युतीबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील 
- अपेक्षित निकाल आहे. मागच्या निवडणुकीत शिवसेनेला जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र २१ जागा मिळवत शिवसेना महापालिकेतला दुसरा मोठा पक्ष झाला आहे. मतदारांनी पुरस्कृत उमेदवारांना नाकारले तरी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिले आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास निश्चितच सार्थकी लावू. सोलापुरात भाजपसोबत युती करायची की नाही, या बाबतचा निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतील.
” पुरुषोत्तमबरडे, जिल्हा समन्वयक, शिवसेना 

स्वबळावर सत्तेसाठी प्रयत्न 
- जनतेने अपेक्षापेक्षा जास्त विश्वास भाजपवर व्यक्त केला आहे. विकासकामे करून त्यांचा विश्वास पात्र ठरवू. सत्तेसाठी तीन जागा कमी पडत असून, युतीबाबत तूर्त विचार नाही. भाजप स्वबळावर सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करेल. पक्षाच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत निर्णय होईल.
” प्रा.अशोक निंबर्गी, शहराध्यक्ष, भाजप 
 
चुका सुधारण्याचा प्रयत्न करू 
- जनतेसमाेर विकासाच्यामुद्द्यावर गेलो होतो. काही चुका झाल्या, त्या सुधारू. राष्ट्रवादीसाठी हा निकाल धक्कादायकच आहे. पक्षाचे सर्वच प्रमुख उमेदवार पराभूत झाले. ज्यांनी काम केले होते, त्यांनाही जनतेने नाकारले. आम्ही कारणे शोधू. सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा निर्णय वरीष्ठ नेते घेतील.
” भारत जाधव, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...