आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापुरात नोटाबदलीचा धंदा तेजीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या सोलापुरात नाेटाबंदी झाल्यापासून सध्याला जुन्या नोटा बदलून त्याचे चालू चलनात रुपांतर करण्याचा धंदा मोठ्या तेजीत सुरू आहे. यात अनधिकृत सावकारी करणारे, ऊस तोड कामगारांचे ठेकेदार, कापूस मोठ्या उद्योगातील धेंडे सामील असल्याचे निदर्शनास आले आहे.
मुळात जनधन योजना सुरू झाल्यावर निल असणारी काही खाती सध्या करमुक्त रेषेच्याखालील सव्वादोन लाख रुपयांपर्यंत भरलेली तर आहेतच, तसेच काही भागात लाखाच्या नोटा बँकेत जमा करून त्याच्या बदल्यात १५ ते ३० हजार रुपये खाणारी नवी टोळीही तयार झाली आहे. वेगवेगळे फंडे वापरून हे पैसे ब्लॅकचे व्हाईट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश कर्नाटक अशा सीमांवर वसलेले सांस्कृतिक ऐतिहासिक महत्त्व असणारे सोलापूर येथे आता हा नवा फंडा उदयास आला आहे. यामुळे धनदांडग्यांसाठी हे आकर्षण चलन विनिमयाचे स्थळ बनले आहे.

३. या खेळींव्यतिरिक्त अजून एक खेळी आहे, ती म्हणजे या काळ्या पैशाला व्हाईट करण्यासाठी एक टोळीच तयार झाली आहे. ती लोकं या पैसेवाल्यांना थेट भेटत एक लाख रुपयांचे ७० हजार देतो अशा भाषेत हा पैसा फिरवून पैसे उकळत आहेत. तसेच एका ठरावीक मुदतीत हे पैसे मिळतील असे मोठमोठे व्यवहार केवळ एका बोलीवर सुरू आहेत. विश्वास बसणारी गोष्ट पण खरी आहे.
२. खासगी सावकारांकडून पूर्वी १० ते २० टक्क्यांनी पैसे फिरवले जायचे. पण आता नोटाबंदी झाल्यापासून ही टक्केवारी कमी झाली आहे. ती अवघ्या ते टक्क्यांवर आली आहे. जुन्या नोटा देऊनच केवळ एक डायरी आणि दहशतीवर हा धंदा सुरू आहे. एका सावकाराने तर हातउसने म्हणून १०० हजार रुपये दिल्याचे केगाव येथील रहिवासी दत्ता पवार यांनी सांगितले.
१. आपल्या जवळचा नातेवाईक, त्याचे आप्तेष्ट, त्याचा जवळचा होतकरू किंवा दैनंदिन राेजगारावर कामाला जाणारा मित्र हेरून त्याच्या बचत खात्यात दोन ते सव्वादोन लाख रुपये भरले जात आहेत. या बदल्यात त्याला भरीव नसला तरी पाच-दहा हजारांचा मोबदलाही दिला जात असल्याचे सम्राट चौक परिसरात राहणारे कस्तुरबा मंडईत भाजीविक्री करणारे सदानंद कांबळे यांनी सांगितले. यात ते खुशही असल्याचे ते म्हणतात.
असे आहेत फंडे
काळे पैसे पांढरे करण्याच्या धंद्यात अनधिकृत सावकारी करणारे, ऊसतोड कामगारांचे ठेकेदार, कापूस मोठ्या उद्योगातील धेंडे सामील, गरजूंना देताहेत कमिशनचे आमिष
५. काळे पैसे पांढरे करण्यासाठी ऊसतोड विडी कामगारांना यासाठी वापरले जात असल्याचे एका विडी कामगार नेत्याने सांगितले. एका कामगारास ५० हजार ते लाख रुपयांच्या जुन्या नोटा देत त्यांच्या बचतखात्यावर जमा केल्या जात आहेत. तसेच तीनचार दिवसांनी पुन्हा चेकरूपाने हे पैसे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर घेत काळा पैसा पांढरा करण्याचे प्रकार होत आहेत.
६. अजूनअफलातून फंडा निघाला आहे की, ज्येष्ठ नागरिकांना बँकेतील खात्यावर एक टक्का जास्तीचे व्याज मिळत असल्याने ओळखीच्या नातेवाईकांच्या ज्येष्ठांच्या नावे रकमा ठेवल्या जाऊन याच पैशातून जास्तीचा फायदा उचलण्याचे नवे तंत्र या अक्कल बहाद्दरांकडून विकसित करण्यात आले आहे. या मार्गानेही काळे पैसे पांढरे करण्यात येत आहेत. यापोटी ज्येष्ठांना काही कमिशनही दिले जात आहे.
४. सराफीबाजारात तर वेगळेच सुरू आहे, रोखीने किंवा कार्ड स्वॅपिंगने सोने खरेदी केले तर २९ ते ३० हजार रुपये एक तोळा असे सोन्याचे दर आहेत. तर काळ्या पैशाचे चलनरूपी पैशात रुपांतर करायचे असेल तर ३५ ते ३६ हजार रुपये एक तोळा या दराने सोनेखरेदी होत अाहे. काही सराफांमुळे संपूर्ण सराफकट्ट्याला काळीमा फासण्याचे काम होत असल्याचे सराफ व्यापाऱ्याने नाव सांगण्याच्या बोलीवर माहिती दिली.
बातम्या आणखी आहेत...