आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्ल्यू व्हेल' गेममधून बाहेर येणे शक्य, पाल्यांच्या मोबाइलवर पालकांचे हवे नियंत्रण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ब्ल्यू व्हेल गेम खेळणाऱ्या मुलाला त्यातून बाहेर काढायचे असल्यास सेटिंगमध्ये जाऊन त्यातून बाहेर पडता येते. त्यामुळे त्या खेळापेक्षा आपला जीव लाख मोलाचा आहे, याचे भान ठेवावे, असा सल्ला सोलापूर, मुंबई येथील सायबर क्राइम तज्ज्ञ आणि संगणक तज्ज्ञांनी दिला अाहे. मोबाइल वापरणाऱ्या विद्यार्थ्यांवर पालकांचे लक्ष असावे, हे ही महत्त्वाचे अाहे, असेही त्यांनी सांगितले. 
 
ब्ल्यू व्हेल गेेम खेळताना त्याचे पन्नास टास्क असतात. मुले या गेमच्या जाळ्यात अडकतात आणि तो जो टास्क देतो, त्यानुसार ते करत असतात. या टास्कच्या माध्यमातून गेम खेळणारा आपल्या आयुष्याचे बरेवाईट करून घेतो. हे अांतरराष्ट्रीय पातळीवरील लोन सोलापुरातही पोहोचले अाहे. हे गेम पन्नास टास्क पूर्ण झाल्याशिवाय बंदच होत नाही. बंद केल्यास काही तरी धोका होतो, असा गैरसमज पसरवण्यात आला आहे. मात्र "दिव्य मराठी'ने सोलापूर, मुंबई येथील सायबर क्राइम तज्ज्ञ आणि संगणक तज्ज्ञांशी संपर्क साधला असता हा गैरसमज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
 
पुढील स्लाइडवर, सोलापूर, मुंबईच्या सायबर क्राइम तज्ज्ञांनी दिला सल्ला...
बातम्या आणखी आहेत...