आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. झंगे यांच्या अटकेच्या अफवेने अणदूरमध्ये तणाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अणदूर- डॉ.प्रशांत झंगे यांना पोलिसांनी अटक केल्याच्या अफवेने सोमवारी (दि. १) दुपारनंतर अणदूर (ता.तुळजापूर) गावात तणाव निर्माण झाला. तब्बल तास गावात बंद पाळण्यात आला. शेवटी डॉ. झंगे यांना पोलिसांनी सोडून दिल्यानंतर सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले.

अणदूर येथील डॉ. झंगे यांच्या क्लिनिकमध्ये सोमवारी चिवरी येथील एक महिला उपचारासाठी आली होती. या वेळी डॉ. झंगे यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरला जाण्याचा सल्ला दिला. रुग्ण महिलेला सोलापूरला नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. या वेळी नातलगांनी डॉ. झंगे यांच्या चुकीच्या उपचारामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत महिलेच्या मृतदेहासह जीप थेट त्यांच्या रुग्णालयाच्या समोर आणून उभी केली. यामुळे प्रचंड गर्दी झाली. यााबाबत माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी अणदूरकडे धाव घेऊन डॉ. झंगे यांना ताब्यात घेऊन नळदुर्गला नेले. या प्रकारामुळे संतापलेल्या अणदूरच्या ग्रामस्थांनी डॉ. झंगे यांना सोडून द्यावे या मागणीसाठी बंद पुकारला. व्यापाऱ्यांनीही तत्काळ दुकाने बंद करून यामध्ये सहभाग नोंदवला. जागोजागी निषेधाचे फलक लागले. वातावरण तणावपूर्ण बनले. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारून डॉ. झंगे यांना अटक झालेली नसल्याचे सांगितले. तसेच सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आले त्यानंतर तणाव निवळला. या वेळी दीपक घुगे, संतोष मुळे, राजेश देवसिंगकर, सिद्राम शेटे, भीमाशंकर मुडवे, देवेंद्र घुगे, अण्णाराव शेटे, बसवराज नरे, उमाकांत कर्पे यांच्यासह गावातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...