आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बीएसएनएल’च्या महाकृषी संचार योजनेला अत्यल्प प्रतिसाद, पोर्टेब्लिटी वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- भारत संचार निगम लिमिटेड अर्थात ‘बीएसएनएल’च्या नवीन महाकृषी संचार प्लॅनला जिल्ह्यात सर्वत्रच अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. प्लानचे मासिक भाडे वाढल्यामुळे तसेच मोफत कॉल जीपीआरएस डेटामध्ये मोठी कपात केल्यामुळे प्रतिसाद नसल्याचे बाेलले जात आहे.
शेतकऱ्यांना अापसात सहज सुलभतेने संपर्क साधता यावा, यासाठी ‘बीएसएनएल’ने काही वर्षांपूर्वी महाकृषी संचार योजना सुरू केली होती. यातून सुरुवातीला पोस्टपेड सीमकार्ड देण्यात आले होते. यामध्ये ९९ रुपये मासिक भाडे, एक जीबी जीपीआरएस डेटा, अन्य कंपन्यांना ४०० तर २०० ‘बीएसएनएल’ नेटवर्कवर मोफत कॉल, ४०० एसएमएसची सुविधा देण्यात आली होती. नंतर याच सुविधेत प्रिपेड कार्ड देण्यात आले. त्यानंतर १०८ १०९ रुपयांचे प्लान सुरू झाले. यामध्ये एक जीबी डेटा, एसएमएसमध्ये विशेष बदल केले नाहीत. मोफत कॉलमध्ये मोफत जुजबी बदल करण्यात आले. या मासिक भाड्याचे प्लान चांगलेच लोकप्रिय ठरले होते. यामुळे लाँचिंगनंतर आठवड्यातच प्रत्येक तालुक्यात किमान दोन हजार शेतकऱ्यांनी सीमकार्ड खरेदी केले होते. आता दि. नोव्हेंबरपासून १४१ रुपये मासिक भाडे असलेला प्लॉन सुरू करण्यात आला आहे. यामध्ये केवळ ४०० एमबीच मोफत जीपीआरएस डेटा देण्यात आला आहे. अन्य कंपन्यांना केवळ ५० कॉल मोफत आहेत. बीएसएनएलसाठी ४५० कॉल आहेत. इतकी तफावत असलेला प्लान शेतकरी ग्राहकांना आकर्षित करू शकलेला नाही. प्रत्येक तालुक्याचा विचार केला तर १० दिवसांमध्ये २५ ग्राहकही प्रतितालुका मिळू शकलेले नाहीत. बीएसएनएलचा हा प्लान पहिल्या टप्प्यात पूर्णपणे बारगळला आहे.

डेटानसल्याचाही परिणाम
शेतीविषयकमाहिती देणारे अनेक मोबाइलअॅप लाँच झालेले आहेत. तसेच अनेक संकेतस्थळेही सुरू झाली आहेत. सध्या बहुतांश शेतकरी आधुनिकतेवर भर देत आहेत. बीएसएनएलने मोफत डेटा निम्म्यापेक्षाही कमी केला आहे. यामुळे अॅप संकेतस्थळांचे सर्फिंग करण्यासाठी अडचणी येत आहेत. बीएसएनएलचा सध्याचा प्लान महागडा ठरत आहे. अन्य कंपन्या मात्र, स्वस्त दरात थ्रीजी सेवा उपलब्ध करत आहेत. यामुळेही शेतकरी बीएसएनएलकडे पाठ फिरवत आहेत.
२१- कळंब
१३- उस्मानाबाद
००- लोहारा
०४- परंडा
१७- उमरगा

बीएसएनएलने जुन्या प्लानमध्येही बदल केले आहेत. ९९, १०८, १०९ रुपये मासिक भाडे असलेल्या प्लानचे दर वाढवले आहेत. तसेच सुविधाही कमी केल्या आहेत. या तुलनेत अन्य कंपन्या चांगले प्लान सादर करत आहेत. यामुळे ‘बीएसएनएल’च्या ग्राहकांमध्ये पोर्टेब्लिटी सुविधा वापरून तोच क्रमांक ठेवून अन्य कंपन्यांची सेवा घेण्याचा कल वाढला आहे. यामुळे बीएसएनएलचे ग्राहक झपाट्याने कमी होत आहेत. पूर्वी योजनेसाठी रांगा लागत होत्या.
^‘बीएसएनएल’च्या नवीन प्लानला का प्रतिसाद मिळत नाही, हे सांगता येणार नाही. मात्र, अगोदरच ग्राहकांनी सीमकार्ड खरेदी करून सेवा सुरू केली आहे. यामुळे आता अधिक शेतकरी सीम खरेदी करण्याचे राहिलेले नाहीत. यामुळे आता कमी प्रमाणात आकडे दिसत असतील.’’ एस.एस. सोनवणे, मंडल अभियंता, बीएसएनएल.

लेखी तक्रारी नाहीत
बदललेल्याप्लानची चर्चा शेतकरी बाहेरच करून अन्य कंपन्यांची सेवा घेत आहेत. मात्र, बीएसएनएल कार्यालयात यासंदर्भात लेखी तक्रार देण्याची कोणीही तसदी घेतलेली नाही. यामुळे ‘बीएसएनएल’ने प्लानमध्ये वाढीबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही. मात्र, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात ‘बीएसएनएल’ कडे लेखी तक्रारी दिल्या आहेत. या सर्व तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे फॉरवर्ड करण्यात आल्या आहेत.