आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस न थांबविल्याने चालकावर खुनी हल्ला, सुदैवाने हा थरारक अपघात टळल्याने प्रवासी बचावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चालकावर हल्ल्यानंतर नियंत्रण सुटून बस बोर्डवर धडकली. - Divya Marathi
चालकावर हल्ल्यानंतर नियंत्रण सुटून बस बोर्डवर धडकली.
परंडा - परंडाते आलेश्वर बस कुंभेजा फाट्यावर न उभी केल्याने बसमधील अनोळखी युवकाने बस चालकावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. ८) सायंकाळी ६.१५ च्या सुमारास घडली. 
 
बस ( एमएच २०, बी. एल १३४०) परंड्याहून सायंकाळी वाजता आलेश्वरकडे निघाली.कुंभेजा पाटीजवळ बस थांबविली नाही. यामुळे बसमधील विद्यार्थी चालक अर्जुन बिडवे (५४) यांच्यात वाद सुरू झाला. बसमधील अन्य दोन युवक चालक यांच्यातही जोरदार हमरीतुमरी झाली. एकाने चालकास शिवीगाळ करून मारहाण केली. दुसऱ्या युवकाने बिडवे यांच्यावर चाकूने वार केले. यामध्ये चालक बिडवे गभीर जखमी झाले. कॅबिनमध्ये जाऊन युवकाने पोट, कान, मान, हातावर चाकूने सपासप वार केले. कौडगाव येथून परंड्याकडे जात असलेले गणेश सातपुते यांच्या दुचाकीवरून बिडवे यांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. 
 
तेथे प्राथमिक उपचार करून उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. वार करणाऱ्या युवकाची ओळख पटू शकलेली नाही. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, सुदैवाने प्रवासी बचावले...
बातम्या आणखी आहेत...