आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायपासला ‘किलेशन’चा पर्याय, आयटीयन‌ भालचंद्र गोखले यांचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘बायपास किंवा अँजिोओप्लास्टी करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यानंतर रुग्णांनी घाबरून जाऊ नये. दोन्ही उपचार पद्धतींपेक्षा ‘किलेशन थेरपी’ ही आधुनिक उपचार पद्धती उत्तम आहे. त्याचा विचार करावा’, असे आवाहन यआयटीतून एम. टेक. झालेले मुंबई येथील अभ्यासक भालचंद्र गोखले यांनी गुरुवारी केले.

‘बायपास शस्त्रक्रियेला पर्याय : आधुनिक उपचार पद्धत’ या विषयावर ते बोलत होते. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. गोखले यांना स्वत:लाच २००६ मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांनी किलेशन थेरपी घेतली. त्याचा चांगला परिणाम जाणवला. त्यानंतर त्यांनी या विषयाचा अभ्यास केला. पुढे हृदयरोगतज्ज्ञांनाच त्याचे प्रशिक्षण दिले. त्यांनीही ही उपचार पद्धती अवलंबली आहे.

अमेरिकत १० वर्षे संशोधन
सन १९९८ मध्ये किलेशन थेरपीचा उपयोग झालेल्या रुग्णांनी आणि ती देणाऱ्या डॉक्टरांनी अमेरिकेत धरणे धरले. या पद्धतीला मान्यता द्यावी, अशी त्यांची मागणी होती. त्या वेळी अमेरिकन आरोग्य मंत्रालयाने ३१.६ दशलक्ष डॉलर्स खर्च करून या थेरपीवर सुमारे दहा वर्षे संशोधन केले. अभ्यासाअंती ही उपचार पद्धती मधुमेही रुग्णांसाठी अत्यंत उपयोगी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला, असे गाेखले यांनी यावेळी
आवर्जुन सांगितले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय पद्धत...