आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मी वाइन्स शाॅपचे प्रकरण थेट उत्पादन राज्यमंत्र्यांच्या कोर्टात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
सोलापूर - सातरस्ता ते गांधीनगर मार्गावरील लक्ष्मी वाइन शाॅप प्रकरणात आता पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क राज्यमंत्री विजयकुमार देशमुख हे लक्ष घालणार आहेत. महामार्गापासून ५०० मीटरच्या आतील वाइन शाॅप बंदीचे आदेश असतानाही पळवाट काढून हे वाइन शाॅप सुरू ठेवण्याचा प्रकार झाला होता. या प्रकरणी चौकशीचे आदेश देणार असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. 
 
लक्ष्मी वाइन शाॅप महामार्ग यात ५०० मीटरहून अधिक अंतर दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न दुभाजकांतील पादचारी मार्ग बंद करून १३ एप्रिल रोजी केला होता. त्यानंतर शाॅप सुरू करण्यात आले. ‘दिव्य मराठी’ने ही बनवाबनवी उघड केल्यानंतर महापालिकेने पादचारी मार्ग खुला केला. पण याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्यात चालढकल केली. हे अंतर मोजण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा रस्ता महापालिकेच्या हद्दीतील असल्यामुळे आम्ही मोजू शकत नाही, असे उत्तर दिले. यानंतर महापालिकेकडे पत्र व्यवहार करून पादचारी मार्गाचा वापर कसा होता, याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने पत्रव्यवहार केले. उत्पादन शुल्क विभागाने ठोस कारवाई करण्याऐवजी तांत्रिक बाबींच्या मागे लपण्याचा प्रयत्न सुरू केला. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी अहवाल मागवून घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतरही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईची कसलीच हालचाल झाली नाही. आता पालकमंत्र्यांनीच चौकशीचे आदेश देणार असल्याचे सांगितल्याने राज्य उत्पादन शुल्कच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
 
- लक्ष्मी वाइन्सशॉप प्रकरण नेमके काय आहे, कोण कोण काय काय करत आहे, याची चौकशी करायला लावतो. जो दोषी असतील मग तो कोणीही असो, गय केली जाणार नाही. विजयकुमार देशमुख, पालकमंत्री तथा उत्पादन शुल्कमंत्री 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...