आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कॅशलेस’ तिकिटाने रेल्वे प्रवासी हेल्पलेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावरील आरक्षण केंद्रात बसवलेले पॉस मशिन आता प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पॉस मशिनच्या मदतीने काढलेले तिकीट जर रद्द करायचे असेल प्रवाशांचा स्थानकावर जवळपास दीड ते दोन तासांचा वेळ वाया जात आहे. टीडीआर पद्धतीने प्रवाशांना तिकिटांतील उर्वरित रक्कम दिली जाते. तिकीट रद्द झाल्यानंतर तिकिटाची रक्कम बँक खात्यावर जमा होते. मात्र यासाठी त्यांना किमान महिना ते दोन महिने प्रतीक्षा करावी लागते. 
 
सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलती देणे गरजेचे आहे. मात्र रेल्वे प्रवाशांसाठी कॅशलेस व्यवहार हा डोकेदुखी ठरत आहे. कॅशलेस व्यवहारामुळे प्रवासी आता हेल्पलेस होत आहेत. 

नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांनी कॅशलेस व्यवहाराकडे वळावे, असे सरकारने आवाहन केले. एटीएम, डेबिट क्रेडिट कार्डच्या मदतीने प्रवाशांना तिकीट काढता यावे, या करिता सोलापूर स्थानकावर तीन मशिन बसवण्यात आल्या. कॅशलेसचा व्यवहार सुरळीत होतो. मात्र अडचण येते तिकीट रद्द करतेवेळी. 

प्रवाशांना पॉस मशिनच्या सहाय्याने काढलेले तिकीट रद्द करण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ खर्ची पडत आहे. तर ती रक्कम परत मिळण्यासाठी महिना ते दोन महिने वाट पाहावी लागत आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांना होणारा मन:स्ताप कमी झाला नाही तर प्रवासी आपसूकच कॅशलेस व्यवहारांकडे पाठ फिरवतील, यात शंका नाही. 

ही आहे टीडीआरची प्रक्रिया 
तिकीटरद्द करण्यासाठी आरक्षण केंद्रावर गेल्यानंतर प्रवाशांनी सर्वप्रथम तिकीट रद्द करण्याचा फॉर्म भरून त्यावर टोकन क्रमांक घ्यायचा. आपला टोकन क्रमांक काेणत्या तिकीट खिडकीवर येतो त्या खिडकीवर जाणे. हा क्रमांक येण्यासाठी प्रवाशांना १५ ते २० मिनिटे अथवा तासाभराचा विलंब लागू शकतो. त्यानंतर तिकीट रद्द केले जाते. पण त्याच वेळी प्रवाशांना आरक्षण केंद्रावरून टीडीअारचा (तिकीट डिपॉझिट रिसीट) फॉर्म दिला जातो. या फॉर्मला बँक पासबुक आधार कार्डची छायांकित प्रत जोडणे अनिवार्य आहे. मग हा फॉर्म उपस्थानक व्यवस्थापक वाणिज्य यांच्याकडे घेऊन जाणे. त्यांच्याकडून फॉर्मवर सही शिक्का घेणे. यानंतर तिकीट निरीक्षक यांच्याकडे तो फाॅर्म जमा करणे. तिकीट निरीक्षकाकडे जमा झालेला फॉर्म मुंबईला पाठवून देण्यात येतो. मुंबईला गेल्यानंतर तिकिटाचे व्हेरिफिकेशन अन्य प्रक्रिया पार पडते. मग बँक खातेदारांच्या नावाने धनादेश निघतो. तो बँकेला पाठवून दिला जाताे. मग ती रक्कम संबंधित प्रवाशाच्या बँक खात्यावर जमा होते. 

वरिष्ठ स्तरावर विचार होईल 
^तिकिटाची उर्वरित रक्कम जमा होते. रक्कम परत देण्याची ही जुनी पद्धत आहे. यामुळे प्रवाशांना जर त्रास होत असेल तर त्यात बदल करणे गरजेचे आहे. याचा वरिष्ठ स्तरावरून विचार केला जाईल.” अनिलकुमारसक्सेना, मुख्य जनसंपर्क अधिकारी, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली 
 
बातम्या आणखी आहेत...